माईंच्या कार्याला विलु पुनावाला फाउंडेशनची साथ – सीईओ जसविंदर नारंग यांचे प्रतिपादन

ममता बाल सदनमध्ये विलु पुनावाला यांच्या अर्धाकृती ब्रांझ पुतळ्याचे अनावरण, नवीन कॅफेटेरिया, किचन बिल्डिंगचे उदघाटन

अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आनण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात सर्व संस्थांचे कार्य त्याच पद्धतीने सुरु असल्याचे बघून मला आनंद होतो आहे. माईंचे हे पावन कार्य आम्ही निरंतर सुरू राहावे यासाठी त्यांच्या कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी विलु पुनावाला फाउंडेशनची साथ आम्ही देणार शेवट पर्यंत देणार आहोत, असा विश्वास विलु पुनावाला फाउंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग यांनी आज मंगळवारी कुंभारवळण येथे व्यक्त केला.
ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण विलु पुनावाला यांच्या अर्धाकृती ब्रांझ पुतळ्याचे अनावरण आणि नवीन कॅफेटेरिया, किचन बिल्डिंग हॉलचा उदघाटन सोहळा उदघाटक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा यांचे हस्ते तर विलु पुनावाला फाउंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवारी पार पडला. या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलताना सीईओ जसविंदर नारंग म्हणाले कि, कुठल्याही अडचणीमुळे माईंचे थांबू नये यासाठी डॉ. सायरस पुनावाला आणि अदर पुनावाला यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. अनाथ मुला-मुलींना देखील चांगल्या दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हि भावना त्या मागची असून आज ममता बाल सदनमधील प्रसन्न वातावरण बघून आम्ही सर्व भारावून गेलो, असे हि म्हणाले. पुनावाला फाउंडेशनतर्फे बांधन्यात आलेल्या नवीन कॅफेटेरिया, किचन बिल्डिंग हॉलमुळे मुलींना जेवण्यासाठी छान व्यवस्था झाली त्याबद्दल ममता सिंधुताई सपकाळ यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी संस्थेची माहिती त्यांनी उपस्थित मान्यवर अतिथींना दिली. यावेळी कु. साक्षी सपकाळ हिने पारंपारिख पोशाखात गणेशवंदना सादर केली. कु. सारिखा कुंजीर हिने ‘मी सिंधुताई सपकाळ बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर करून सर्वांचे लक्ष्य वेधले. कु. पुजा सावंत हिने माईवर कविता तर जान्हवी सपकाळ हिने मनोगत मांडले. चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांना भूरळ घातली. कार्यक्रमाला प्रामुख्याने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा, विलु पुनावाला फाउंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग, सचिन कोलटकर, तेजस सर, सचिन सर, ममता सपकाळ, ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड, विनय सपकाळ, मनीष जैन, पुजा जैन, कल्याणी फोर्जचे राहुल सावंत, कुंभारवळणचे सरपंच सौ. अश्विनीताई खळदकर, खळदचे सरपंच दशरथ कादमाने, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती देविदास आप्पा कामठे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे योगेश कामठे, ग्रा. पं. सदस्य सौ. निलिमाताई कुंभारकर, सौ. रंजनाताई खळदकर, सौ. मंजुषाताई गोपाल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कुंभारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनीष जैन तर आभार ममता बाल सदनच्या अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सौ. सुजाता दिपक गायकवाड, सौ. मेघा नेमाने, रवी ओहोळ, सौ. मंजुषा गायकवाड, ज्योती सिंधुताई सपकाळ, संजय गायकवाड, गोपाल गायकवाड, प्रसन्ना गायकवाड, पवन गायकवाड, रितेश जांभुळकर, रोहित रोडे, चांदणी शिरोडकर, नाना कुंभारकर अशोक पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि पत्रकार बांधव यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पुणेरी पगडीने केला खास सन्मान
पुणे जिल्ह्यासाठी अतिशय मानाची असलेली पुणेरी पगडी हि काही औरच खासियत आहे. ममता बाल सदन मध्ये आलेले सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा आणि विलु पुनावाला फाउंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग यांना मंचावर बसल्यानंतर मानाची पुणेरी पगडी, शाल व शिफळ देऊन खास सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेला भरीव मदत केल्याबद्दल ममता बाल सदनच्या वतीने डॉ. सायरस पुनावाला आणि अदर पुनावाला यांच्यासाठी दोन मानाची पुणेरी पगडी पॅक करून सीईओ नारंग यांच्या सुपूर्द केले. यथोचित सन्मान बघून प्रमुख पाहुण्यांना भरून आले.
रोपट्याचे झाले वटवृक्ष कळलेच नाही
अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी कुंभारवळण येथे १९९३ साली अनाथ मुलींसाठी पहिला अनाथ आश्रम सुरु केला. तेव्हा दहा-बाय-दहाच्या मोडक्या-तोडक्या खोलीमध्ये अनाथ मुलींचा सांभाळ करण्यात येत होता. अचानक एकदा दैनिक प्रभातचे मालक अशोक गांधी यांनी भेट दिली त्यावेळी खोलीच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे पडले होते. हे पाहून त्यांनी नवीन खोली बांधून दिली. तेव्हापासून आजवरचा प्रवास बघितला तर आज मोठं-मोठ्या इमारती निर्माण झाल्या आहेत. अनाथ मुली उच्चं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहून संसाराला लागल्यात. माईंच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात असताना माईंनी लावलेल्या छोट्या रोपट्याचा वटवृक्ष कधी झाला हे कळलेच नाही, आज खऱ्या अर्थाने माईंचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे, अशी माहिती ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page