महिलांसाठी विविध उपक्रम राबवून म्हाळसादेवी मंडळाने आदर्श निर्माण केला- आ. संजय जगताप. जोशी, खोमणे,जगताप यांना पुरस्कार…
जेजुरी, दि २३ जेजुरी येथील म्हाळसादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने उद्योजक रवींद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते सचिन खोमणे, उमेश जगताप यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरवर्षी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून म्हाळसा देवी मंडळाने समाजात आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
जेजुरी विद्यानगर परिसरातील म्हाळसादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक,धार्मिक,व आद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रविंद जोशी यांना उद्योगरत्न , जेजुरी शहर बाराबलुतेदार संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे पाटील,यांना समाजभूषण,व पुरंदर तालुका मनसेचे अध्यक्ष उमेश जगताप यांना समाजरत्न पुरस्कार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते देवून सन्मानित केले.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की, गेली बारा वर्षे या मंडळाने,स्त्री जन्माचे स्वागत,जागर महिलांचा,महिलांना रोजगार व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जेजुरी जत्रा, आरोग्य शिबिरे,महिलांचा सन्मान असे उपक्रम राबवून महिलांचा आत्मसन्मान केला आहे. तसेच येथील महिला संघटीत झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यकाळात आणखी चांगल्या सुविधा दिल्या उपलब्ध केल्या जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी जेजुरी पालिकेचे गटनेते सचिन सोनवणे,नगरसेवक अजिंक्य देशमुख, हेमंत सोनावणे, सुशील राउत,योगेश जगताप,बाळासाहेब जगताप,देवसंस्थानचे माजी विश्वस्त पंकज निकुडे,ईश्वर दरेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे पदाधिकारी विद्या म्हेत्रे,सुमती पुजारी,आशा देवकर,कविता पवार,दिनेश डोईफोडे,गणेश देवकर,चांगदेव थिकोळे, महेश म्हेत्रे ,सचिन सातभाई,आदींनी केले