महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदी केशवराव जाधव
पुरंदर तालुका पत्रकार संघाकडून अभिनंदन.
जेजुरी – दि.२२ कार्यकारी मंडळाची सभा शिक्षक भवन पुणे येथे आज दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाली.
यावेळी राज्यातून सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व समन्वय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस शिक्षक नेते कै.शिवाजीराव पाटील आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन राज्यसंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष मा श्री दि.रा.भालतडक व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सर्वांनुमते राज्य कार्यकारी मंडळाच्या कार्यकारीणीमध्ये मोठे बदल करण्याचे सुचविले.
यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
कार्यकारी मंडळ सभेला संबोधित करताना अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील म्हणाले,”प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी लवकरच संबंधित मंत्री महोदयांबरोबर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे ठोस नियोजन करण्यात येईल.तसेच भविष्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ बळकट करण्यासाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरीय संघटन मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष घालणार आहे व निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये काम करण्याची भविष्यात संधी देणार.” असे सांगितले.
तसेच कार्यकारी मंडळाने नेते माधवराव पाटील व सुकाणू समितीस राज्य संघ पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले.
त्यानुसारराज्य शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष म्हणून श्री. केशवराव जाधव – बारामती,राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस लायक पटेल -लातूर,राज्य शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष लोमेश वराडे – वर्धा तसेच राज्य शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष संभाजी बापट – कोल्हापूर यांची निवड करण्यात आली.
यावेळी राज्य शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे,ज्येष्ठ सल्लागार दि. रा. भालतडक ,वसंतराव हारुगडे,बाळासाहेब काळे, तुकाराम कदम, ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत,सांगली जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी,पालघर जिल्हाध्यक्ष पिंपळे,रायगड जिल्हाध्यक्ष म्हात्रे,रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष नागवेकर,जालना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब झुंबड,पुणे जिल्हा अध्यक्ष मुजुमले,पुणे महानगरपालिका अध्यक्ष चोरमुले,सोलापूर जिल्हा अध्यक्ष यादवाड,यवतमाळ जिल्हाध्यक्ष जाधव, सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष शिवानंद भरले,सातारा जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे,धुळे, नंदुरबार व इतर जिल्ह्याचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष केशवराव जाधव हे परिंचे तालुका पुरंदर येथील मूळ रहिवासी असून यांची निवड झाल्याबद्दल पुरंदर तालुक्यातून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
केशवराव जाधव यांचे निवडीबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक बी एम काळे,प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम, नंदकुमार चव्हाण, धनंजय जगताप,प्रकाश जगताप आदिंनी जाधव यांच्या निवडीबद्दल सन्मान केला.