महाराष्ट्राचे सुपुत्र ‘उदय लळीत’ सुप्रीम न्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती ‘उदय लळीत’ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली असून त्यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमूर्ती उदय लळीत यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यायमूर्ती लळीत यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.
“महाराष्ट्र सुपुत्र न्या. लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धिंगत करणारी ठरेल” असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.