मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान, सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची मराठ्यांना खाज…
उस्मानाबाद दि.२६ वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली असे सावंत म्हणाले आहेत.
यावेळी तानाजी सावंत म्हणाले कि, . आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. सावंत यांच्या या वक्तव्यामुळे वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. उस्मानाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. याबाबत महिनाभरात निर्णय घ्यावा. अन्यथा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी घटनाबाह्य पद्धतीने घेतलेल्या आरक्षणाचा लाभ न्यायालायात आव्हान देऊन रोखू, असा इशारा मराठा मोर्चा समन्वयकांनी अलीकडेच दिला होता. मात्र, आता तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.