मराठा समाजबद्दलचे आक्षेपार्ह विधान… आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना अगतिक होऊन हात जोडत माफीच मागावी लागली.
पुणे, दि.२६
काल एका जाहीर सभेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले, कि या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते?
त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत टोला लगावला. त्यामुळे मराठी क्रांती मोर्चा व अन्य संघटना या तानाजी सावंत यांच्याविरुद्ध आक्रमक झाल्या. तानाजी सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या.
त्यावरआमच्या ग्रामीण भागातील चर्चेबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. बोलण्याच्या अघोत बोलून जातो. त्याचा अर्थ कुठे तरी मराठी समजाच्या भावना दुखवाव्यात. त्यावर कुठे तरी राजकीय ताशेरे मारावेत.या पठडीतला मी मुळीच नाही.हे तुम्ही आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे.त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे माझ्या समजाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील.तर माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो. असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
तानाजी सावंत म्हणाले, मराठा समाजातील मुला मुलींना त्यांच्या करिअर करीता आरक्षणाची गरज आहे.आमचा समाज मागासलेला आहे.तसेच ज्या कोणी ते वक्तव्य दाखवले.पण जवळपास एक तासाच भाषण आहे.मी तासभर बोलो आहे.मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही.तर मी राजीनामा देईल.या भाषेत मी बोललो आहे.पण पहिल मी माझ्या मराठा समाजा सोबत राहणार आहे. असे तानाजी सावंत म्हणाले.
सावंत यांना तरीही मराठा संघटना, तसेच विविध राजकीय पक्ष नेत्यांनी टीकेची झोड उठवल्यामुळे समाज माध्यमांसमोर वारंवार माफी मागावी लागत आहे.
अगदी पाळण्यातील तान्ह्या बाळापासून ते आजोबा पणजोबा पर्यंतच्या सर्वांनी हात जोडून माफी मागण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. अजून ही त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे