मनोज जरांगे यांनी घेतले कुलदैवत खंडोबाचे दर्शनमराठा आरक्षण मिळवण्याचा केला निर्धार…..

मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील
जेजुरी, दि. १६ मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज तीर्थक्षेत्र जेजुरी येथे येऊन कुलदैवत खंडेरायाचे जेजुरीगडावर जाऊन दर्शन घेतले. मराठा आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी खंडेरायाला साकडे घातले शिवाय आरक्षनाच्या लढ्यात यश मिळू दे असे ही त्यांनी कुलदैवताला साकडे घातले.

यानंतर जुनी जेजुरीतील मुख्य चौकात जरांगे पाटील यांनी सकल मराठा बांधवाना संबोधित केले. ते म्हणाले, गेल्या ७० वर्षात मराठ्यांना का आरक्षण दिले नाही. मुळातच मराठा समाज हा मागासलेला आहे. कुणबी समाज म्हणून जुन्या नोंदी आहेत. त्या नोंदीनुसार मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळायलाच हवे. मराठा कोणाच्या हक्काचे मागतच नाही. आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळायला हवे.

आणि आम्ही ते मिळवणारच आहे. एकट्या जेजुरी व परिसरात शंभर नोंदी सापडल्या आहेत. एक नोंद जरी सापडली तर साधारणपणे ६१२ जणांना आरक्षण मिळू शकते. ही वस्तुस्थिती असताना ही शासन आरक्षण देऊ इच्छित नाही. गेल्या ७० वर्षात शासनाने मराठयांना आरक्षण दिलेले नाही. आज माझा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. शासनाने दिलेल्या वेळेत आरक्षण दिले पाहिजे. आणि ते शासनाला द्यावेच लागणार आहे.


शासन एकीकडे आरक्षण देऊ असे म्हणते तर दुसरीकडे मराठा बांधवाना आरक्षण देता येणार नाही असे सांगून संभ्रम निर्माण करीत आहे. चुकीची विधाने करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून कोणाही बांधवाने अशा संभ्रमात पडू नये. शासनाला आरक्षण हे द्यावेच लागणार आहे. माझ्यावर ही टीका केली जाते. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी मात्र आरक्षणाबाबत आग्रही आहे. मला कोणीही अडवू शकत नाही. किंवा या मराठा आग्या मोहोळा च्या जीवावर माझ्या नादाला ही कोणी लागणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक इंच ही मागे हटणार नाही. तुम्ही ही मागे हटायचे नाही. आपला लढा यशस्वी होणार म्हणजे होणारच असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.


यावेळी जेजुरीकरांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
जेजुरीत जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळण्यात आली. जेजुरी गडावर मार्तंड देव संस्थान च्या वतीने त्यांचा पगडी देऊन सन्मान करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी व परिसरातील सकल मराठा समाजाकडून करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page