मंत्री महोदय भुजबळ, मुंडे ना धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात…
जेजुरी, दि.११ राज्याचे नवनिर्वाचित मंत्री महोदय छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या ला पुणे पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे
याबाबत पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली ती अशी की, ना. छगन भुजबळ यांना पुणे दौऱ्यावर असताना तर धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत पुणे कोरेगाव पार्क आणि परळी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. याबाबतचा समांतर तपास पुणे गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथक करीत असताना खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना धमकी देणारा इसम हा रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस कर्मचारी संजय भापकर, सयाजी चव्हाण, राजेंद्र लांडगे यांनी महाड जि. रायगड येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. धमकी देणारा आरोपी प्रशांत दशरथ पाटील, वय २४ वर्षे, रा. कडलगे खुर्द, पो. ढोलगर वाडी, ता.चंदगड, जि. कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहाययक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाययक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.