भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत गणेशोत्सव
जेजुरी, दि. २२ अमेरिकेतील सिरेक्यूज विद्यापीठात अनेक भारतीय विद्यार्थ्या उच्च शिक्षण घेत आहेत.विषेतःहा महाराष्ट्र,गुजारत व दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांची संख्या येथे मोठी आहे. भारतीय परंपरा संस्कृती,उत्सव ,येथे दरवर्षी साजरे केले जातात.
यापूर्वी या शहरात महाराष्ट्र,गुजरात,आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी गणेशोत्सव आपापल्या ग्रुप मध्ये साजरे करीत होते २०१४ पासून एकत्रित येवून गणेशोत्सव साजरा केला जातो.
यावर्षी हा उत्सव साजरा करण्याची जवाबदारी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडे होती पुणे येथील अभिषेक गवळी, आर्यन काकडे, शौलक देव तसेच मुंबई येथील अनंत राजपुरोहित,शिल्पा वाडे,अनिकेत खोटकर यांनी त्यांच्या सिरेकयुज येथील निवासस्थानी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई ,रांगोळी काढून श्री गणेशाची स्थापना केली. तिन्ही ही राज्यातील भारतीय विद्यार्थी दररोज श्री गणेशाच्या आरती साठी उपस्थित राहून मनोभावे उत्सव साजरा करीत होते. अमेरिकन नागरिकही त्यांच्या या उत्सवात सहभागी होत आहेत.
सलग तीन दिवस हा उत्सव साजरा करून आज तिसऱ्या दिवशी दि. २२ रोजी या विद्यार्थ्यांनी पाण्याचा हौद तयार करून मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन केले. या विसर्जनाच्या वेळी भारतीय विद्यार्थ्या बरोबरच स्थानिक अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते. येथील इंडीयन बजारचे मालक श्री पटेल यांनी यांनी या गणेशोत्सवाची स्पॉन्सरसीप घेतली होती.त्यांनी या उत्सवात प्रसाद, अन्नदान केले असल्याचे अभिषेक गवळी यांनी सांगितले.