भाजप ची बारामती लोकसभा मतदार संघावर नजर पवारांनी दुसरा मतदार संघ शोधावा- आ.राम शिंदे, पवारांना चॅलेंज ?
यापूर्वी राहुल गांधी आणि काँग्रेसचा हक्काचा मानला जाणारा अमेठी लोकसभा मतदारसंघाबाबतही हेच बोलले जात असे, याची आठवणीही राम शिंदे यांनी करुन दिली आहे. मात्र भाजपाने दोन निवडणुकांत त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यातून स्मृती इराणी निवडून आल्या, याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. अमेठीप्रमाणेच बारामती मतदारसंघही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाची नजर आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत भाजपाने या ठिकाणी प्रयत्न केले होते. 2014 आणि 2019 साली जरी या ठिकाणी भाजपा निवडणूक हरली असली , तरी येत्या 2024 मध्ये बारामतीत भाजपाचाच खासदार असेल, असा विश्वास भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 2014 ते 2024 या 10 वर्षांत मोठा बदल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली असल्याचेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी राहुल गांधी आणि काँग्रेसचा हक्काचा मानला जाणारा अमेठी लोकसभा मतदारसंघाबाबतही हेच बोलले जात असे, याची आठवणीही राम शिंदे यांनी करुन दिली आहे. मात्र भाजपाने दोन निवडणुकांत त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यातून स्मृती इराणी निवडून आल्या, याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. अमेठीप्रमाणेच बारामती मतदारसंघही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रमाणे सु्प्रिया सुळे यांनी दुसरा वायनाडसारखा लोकसभा मतदारसंघ निवडावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
येत्या दोन वर्षांवर राहिलेल्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाकडून सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 6 सप्टेंबरला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. तर त्यानंतर 22 ते 24 सप्टेंबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा बारामती दौरा असणार आहे. बावनकुळे यांच्या दौऱ्यातच निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.