भाजप ची खिचडी कोणाचा भात शिजवणार….

पुरंदर, दि. ५ ( बी एम काळे ) पुरंदर तालुक्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपात झालेली नेत्यांची खिचडी नेमका कोणाचा भात शिजवणार ? अशीच चर्चा सद्या तरी तालुक्यातील राजकारणात सुरू आहे.
सण १९ च्या निवडणुकीत सेना भाजप आरपीआय युतीतून सेनेचे विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीतून काँग्रेस चे संजय जगताप यांची दुरंगी लढत झाली होती. यात सेनेच्या उमेद्वाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी ३० हजाराहून अधिक मतांनी शिवतारेंच्या दहा वर्षांच्या राजवटीचा अंत केला होता. या निवडणुकीनंतर मात्र राज्याचे संपूर्ण राजकारणच बदलून गेले. राज्यातील वेगवेगळ्या युत्या आघाड्या, दल बदलू आमदारांमुळे राजकीय समीकरणे बदलून वेगवेगळे सत्ताधीश निर्माण झाले. याचा फटका मात्र सर्वसामान्य मतदाररांपेक्षा कार्यकर्त्यांना बसला. आता हेच कार्यकर्ते सैरभैर असून कोणता झेंडा घेऊ हाती अशीच साधारण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र अजून ही निवडणुकीला वर्ष आहे, तत्पूर्वी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आदींच्या निवडणुका व्हायच्या आहेत. याच निवडणुकीतून विधासभेची तालीम रंगणार आहे. त्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे.
आज मितीचा विचार केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांचे भवितव्य भाजपच्या हाती असणार आहे. ते ही राजकीय पक्ष कस कसे फासे फेकतात त्यावर अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page