बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आ.संजय जगताप,
रत्नागिरी जिल्ह्यात पुरंदरचा डंका
जेजुरी, दि.२६ आर. व्ही .बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली, जि रत्नागिरी या संस्थेच्या अध्यक्षपदी पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार मा. संजयजी जगताप यांची आज निवड करण्यात आली. संस्थेच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड झाल्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
संस्थेची ८ विद्यालये असून त्यामध्ये दोन कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत त्यामध्ये
- न .का वराडकर कला व रा वि बेलोसे वाणिज्य व वरिष्ठ महाविद्यालय आणि शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय
*वरिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य - बी एम एस
- बी एस सी आय टी
- एम ए पदव्युत्तर विभाग
*एम कॉम पदव्युत्तर विभाग
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र दापोली
*आर आर वैद्य इंग्लिश मिडीयम स्कुल दापोली - हर्णे पंचक्रोशी इंग्लिश मिडीयम स्कुल हर्णे
*केळशी पंचक्रोशी इंग्लिश मिडीयम स्कुल केळशी
*बुरोंडी पंचक्रोशी इंग्लिश मिडीयम स्कुल बुरोंडी
*कै गो गु दळवी हायस्कुल वेळवी
*देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देव्हारे ता मंडणगड अशा शाखा असून तीन हजार पर्यंत विध्यार्थी संख्या असून १७५ पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
निवड प्रसंगी संस्थेच्या सभापती मा जानकीताई बेलोसे उपाध्यक्ष मा अभिषेक बेलोसे
कार्यवाह मा दशरथ भोसले
सहकार्यवाह मा अनंतराव सणस
उपसभापती मा कासमभाई महालदार
विश्वस्थ श्रीमती रेडीज, श्रीमती सुनीता बेलोसे , श्री सुरेश मोरे , श्रीशिवाजीराव शिगवण, प्राचार्य डॉ भारत कराड ,
बारामती काँग्रेस चे अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, मा सभापती विठ्ठलराव मोकाशी, नीरा मार्केट कमिटी संचालक संभाजी काळाने, महेंद्र माने आदी उपस्थित होते
संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष आमदार संजयजी जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले