बेलसर येथे पुणे जिल्हा बॅंकेची शाखा सुरू करणार – आ.संजय जगताप

जेजुरी, दि. १० बेलसर येथे अनेक दिवसांपासून येथील व परिसरातील शेतकरी बांधवांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी असुन शेतकऱ्यांचे अर्थकारण सुरळीत व्हावे, त्यांना शेतकी कर्ज तात्काळ उपलब्ध व्हावेत याचा विचार करता येते बँकेची शाखा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
बेलसर( ता.पुरंदर ) येथे खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या फंडातून भोरेमला बंदिस्त गटर योजना व शादवल बाबा दर्गा रस्ता लोकार्पण सोहळा आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुदामराव इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी उपस्थित होते.
यावेळी दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, दत्ता झुरंगे, माणिकराव झेंडे , प्रदीप पोमण,गणेश जगताप,गणेश होले,बापु माने, बाळासाहेब जगताप,वनिता जगताप,कैलास जगताप,रोहिदास जगताप,सुहास जगताप,मामा गरुड, सुभाष जगताप,उत्तम जगताप,बाळासाहेब पांढरे,बाळासो गरुड,कैलास गरुड,विजय गरुड, राजेंद्र जगताप,विशाल जगताप,चंद्रकांत जगताप ,संजय जगताप,स्वप्नील जगताप,कैलास जगताप,संतोष जगताप,रामदास कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बेलसरच्या सर्वांगीण विकासा बाबत वीज उपकेंद्र, साकव पुल,कोल्हापुर बंधारा दुरुस्ती,पुरंदर उपसा पाणी योजना,शादावल बाबा दर्गा सुधारणेसाठी निधी,बेलसर निळुंज शिवरस्ता ,गायरान वस्ती रस्ता,कल्याणी शाळा ते जेजुरी रस्ता,बेलसर चिल्हावली रस्ता,हापसा मागणी,मठवाडी ते धबधबी रस्ता, बेलसर पेठेचा रस्ता,चोपण वस्ती रस्ता आदी विकासकामांसाठी निधी मागण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जगताप यांनी केले तर आभार बळवंत गरुड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page