बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश देत लोणंद मधील ट्रेकर्स ग्रुपने कडेपठार ट्रेकिंग केले पूर्ण
जेजुरी, दि.२३ लोणंद मध्ये प्रथमच सुमारे १२५ नागरिक एकत्र येऊन कडेपठार ट्रेकिंग पूर्ण केले असून या मोहिमे दरम्यान बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश देत कडेपठारच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. लोणंद मधील प्रतिष्ठित नागरिक , डॉक्टर्स ,रोटरी क्लब चे अध्यक्ष ,सचिव यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्या, लोणंद वुमन बाईक रॅलीच्या अनेक महिला सदस्या ,एव्हरेस्ट वीर प्राजित परदेशी मित्र समूह तसेच न्यूज 18 परिवर्तन ग्रुपच्या सदस्य तर आशुतोष, कांचन घोडके यांचा मुलगा ओम वय ८ महिने याचाही समावेश होता.
दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता नगरपंचायत च्या पटांगणाहून मोहिमेस सुरुवात झाली. २५ चार चाकी गाड्यांसह सव्वाशे नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ७० वर्षांचे नंदकुमार देशमुखे यांच्यासह चार वर्षांच्या मुलाने ही यामध्ये सहभाग घेतला. नगरसेविका दिपाली संदीप शेळके ,युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील ,भारत शेळके, अनिल कुदळे ,संतोष मुसळे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बागडे ,डॉक्टर सरोदे, डॉक्टर डोंबाळे ,डॉक्टर बुटीयानी ,डॉक्टर स्वाती शहा ,डॉक्टर सरिता वर्धमाने, डॉक्टर संगीता बुटियानी ,डॉक्टर जयश्री यादव, नगरपंचायतीचे ऑफिस सुप्रीडेंट शंकरराव शेळके, बाळकृष्ण भिसे यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्र शेळके, व्यापारी सुनील शहा, वनपाल मासाळ तसेच प्राजक्ता घोडके यांनी सहकुटुंब ट्रेकिंगचा आनंद लुटला.प्राजित परदेशी मित्र समूह परिवर्तन ग्रुप यांच्या वतीने सर्वांना नाष्टा मसाला दूध पाणी बॉटल तर श्रीकृष्ण डेरी यांच्याकडून पेढे व चॉकलेटचे वाटण्यात आले पंकज गारोळे यांनी सर्वांचे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद केले. प्राजित परदेशी मित्र समूहाने अगदी कमी दिवसात सर्व नियोजन करून लोणंद मधील पहिलाच सव्वाशे नागरिकांचा सहभाग असणारा हा लोणंद ट्रेकर्स ग्रुप तयार करून पहिलीच कडेपठार ट्रेकिंग मोहीम यशस्वी करून दाखवली
नेटक्या नियोजनाबद्दल सर्वांनी एव्हरेस्टवर प्राजित परदेशी मित्र समूहाचे कौतुक करत आभार मानले.