बिहारच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची पुण्यात आत्महत्या

पुणे दि.११ : तपासासाठी बिहार येथून आलेल्या पोलीस महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. बावधन येथे गुरुवारी (दि. ११) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कविता कुमारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलापोलिसाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार येथील मुजफ्फरपूर पोलीस ठाण्यात कविता कुमारी कार्यरत होत्या. कविता कुमारी विवाहित होत्या. एका गुन्ह्यातील आरोपीच्या तपासासाठी चार पोलिसांचे पथक बावधन येथे आले होते. त्या पथकात कविता कुमारी देखील होत्या. हे पथक एका हाॅटेलवर थांबले होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कविता कुमारी यांनी हाॅटेलमध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page