बिल गेट्स ची भविष्यवाणी… २०३० साली स्मार्टफोन कुठेच दिसणार नाही, फोनची जागा हे प्रोडक्ट घेणार..!
आज जगभरातील स्मार्टफोन कंपन्या एकापेक्षा एक भारी फीचर्स सोबत तसेच नवीन टेक्नोलॉजी सोबत स्मार्टफोनला लाँच करीत आहेत. परंतु, आगामी ८ वर्षात स्मार्टफोन दिसणार नाहीत, असं तुम्हाला जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु, बिल गेट्स यांनी ही भविष्यवाणी केली आहे.
नवी दिल्ली, दि.१८ स्मार्टफोनच्या टेक्नोलॉजीत वेगाने डेव्हलप होत आहे. काही वर्षात स्मार्टफोनमध्ये आलेला बदल पाहण्यासारखा आहे. आज स्मार्टफोन मध्ये हायटेक कॅमेरा पासून सॅटेलाइट कनेक्टिविटी आणि फास्ट चार्जिंग पासून वायरलेस चार्जिंग पर्यंत प्रत्येक कामात आवश्यक फीचर्सचा समावेश केला जात आहे. हे इथेच थांबणारं नाही. टेक्नोलॉजीच्या सेक्टरमध्ये खूप वेगाने विकास होत आहे. स्मार्टफोन कंपन्या लागोपाठ याला आणखी चांगले करण्यावर काम करीत आहे. भविष्यात स्मार्टफोनवरून तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात स्मार्टफोन इतके हायटेक होतील की ते खिशात नसणार आहेत. कुणाच्याच हातात मोबाइल दिसणार नाही.
खरं म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट चे फाउंडर बिल गेट्स यांनी स्मार्टफोनसाठी एक अशी टेक्नोलॉजी आणण्याचा प्रयत्न केला होता ज्यामुळे स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक टॅटूने स्मार्टफोनला बदलले जावू शकते. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनच्या जागी एक इलेक्ट्रॉनिक टॅटूला वापरले जावू शकते.
असे असेल स्मार्टफोनचे भविष्य
बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनचे भविष्य म्हणजे याला कुणीच खिशात वापरणार नाही. तसेच कुणाच्या हातात सुद्धा स्मार्टफोन दिसणार नाहीत. तर स्मार्टफोन हे आपल्या शरीरात इंटिग्रेट केले जावू शकतील. म्हणजेच स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूजच्या रुपात बदलले जाईल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटूज एक छोटी साइजची चिप असेल. ज्याला व्यक्तीच्या शरीरात फिट केले जाईल.
नोकियानेही केली आहे भविष्यवाणी
भविष्यात स्मार्टफोन वर नोकियाचे सीईओने सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०३० पर्यंत स्मार्टफोनचा कॉमन इंटरफेस मध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सध्या ६ जी इंटरनेट पर्यंत आपण आलो आहोत. स्मार्टफोनच्या जागी स्मार्ट ग्लास किंवा याच प्रकारचे अन्य दुसरे डिव्हाइसचा वापर केला जाईल. पेक्काच्या माहितीनुसार, २०३० पर्यंत स्मार्टफोनसंबंधित खूप साऱ्या गोष्टी शरीरात थेट इंटिग्रेट केल्या जातील