बार्कलीज कडून ऊसतोड कामगारांना कपड्यांचे वाटप, सचिन टेकवडे यांची माहिती..

जेजुरी, दि.२५ पाणी फाऊंडेशन जलमित्र अंतर्गत बार्कलिझ वॉटर कप टीमच्या वतीने पुरंदर तालुक्यातील नायगाव,नाझरे,मावडीसुपे, आंबले,माळशिरस आदी गावातील सुमारे पाचशे ऊसतोड कामगार,त्यांच्या मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन टेकवडे यांनी दिली.

 अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मनुष्याच्या मुख्य चार मूलभूत गरजा आहेत. बार्केलीझ वाॅटर कप चा सदैव प्रयत्न असतो की जितके शक्य होईल तितके गरजू बांधवांच्या या चार मूलभूत गरजा पूर्ण कराव्या. या साठी बारकलिझ वाॅटर कप टिम मधील अमित मुरळकर, सचिन गोळे, रवि खुळवाह व इतर सहकारी पाणी फाऊंडेशन जलमित्र या मोहीमे अंतर्गत वर्षभर गरजूंना शिधा वाटप, ज्ञानदान मोहिमे अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप, कपडे वाटप करणे निराधार व्यक्तीला मदत करणे असे सेवाकार्य करीत असते.

  नुकतेच पुरंदर तालुक्यातील नायगाव,नाझरे सुपे,मावडी सुपे,आंबले व माळशिरस या पाच गावातील सुमारे पाचशे ऊसतोड कामगारांना कपडे,चादर स्वेटर,चपला,लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले . पुरंदर तालुक्यात ज्या गावी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आहेत त्या प्रत्येक कामगाराला कपडे वाटप करण्याची मोहीम गेली तीन वर्षांपासून हाती घेण्यात आली आहे . सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण असून या थंडीत कपड्या बरोबरच चादर,स्वेटर चपला, बुट मिळाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page