बारामतीकडे सरकलेले पुरंदरचे बहुचर्चित विमानतळ पुन्हा पुरंदर मध्येच फडनवीसांचा बारामतीकरांना दणका

पुणे, दि. ४ राज्यात सत्तांतर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारामतीला नेलेले विमानतळ पुन्हा पुरंदर तालुक्यात हलवून बारामतीकरांना मोठा दणका दिला आहे.
कालच्या ३ सप्टेंबर पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकमंत्री घ्यायला नकार दिला असला तरी बारामतीच्या पवारांना चेकमेट देण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता या बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पुरंदर विमानतळाबाबत राज्यात मध्यतंरी मविआ सरकार स्थापन होताच पुरंदरचं विमानतळ बारामतीकडे सरकलं होतं. पण सत्तांतर होताच फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरलाच हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात सत्तांतर होताच उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी बारामतीला नेलेले विमानतळ पुन्हा पुरंदर तालुक्यात हलवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातलं नवं विमानतळं हे आता अखेर पुरंदरलाच होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मात्र पुरंदर तालुक्यातील नियोजित विमानतळ जागेसाठी भूसंपदीत बाधितांकडून याबाबत कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page