फिनॉलेक्स पाईप उद्योग समूहाकडून मार्तंड देव संस्थान च्या डायलिसिस सेंटरला चार यंत्रे प्रदान….
जेजुरी, दि. १५ आपल्या उद्योग व्यवसायातून ठराविक निधी हा समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्कारनी लागावा हेच धोरण फिनॉलेक्स पाईप उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश छाब्रिया व सौ.ऋतुजा छाब्रिया यांचे राहिले आहे. याच जाणिवेतून मार्तंड देव संस्थान च्या डायलिसिस सेंटर ला ४ अत्याधुनिक डायलिसिस मशिनरी देण्यात आल्याचे समूहाचे समन्वयक सचिन गोयल यांनी सांगितले.
मार्तंड देव संस्थान संचालित जेजुरीतील डायलिसिस सेंटरला सुमारे ३५ लक्ष रुपये किमतीच्या चार डायलिसिस मशिनरी फिनॉलेक्स पाईप उद्योग समूह व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने मोहिनी प्रल्हाद छाब्रिया व प्रल्हाद पी.छाब्रिया यांच्या स्मरणार्थ आज प्रदान करण्यात आल्या. याच बरोबर मार्तंड देव संस्थान च्या येथे देव दर्शनासाठी येणाऱ्या भविकांसाठी शुद्ध व थंड पाण्याच्या दोन यंत्रे कार्यान्वित करून देण्यात आली.
यावेळी मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, फिनॉलेक्स चे जेजुरी विभागाचे व्यवस्थापक अविनाश बामणीकर, देव संस्थान चे मुख्य विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त डॉ.राजकुमार लोढा, अड् अशोक संकपाळ, अड् प्रसाद शिंदे, पंकज निकुडे, शिवराज झगडे, संदीप जगताप, शाहीर सगनभाऊ प्रतिष्ठाण चे उन्मेष बारभाई, अमोल बेलसरे, गोविंद कुडाळकर, दशरथ लाखे, देवसंस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते
फिनॉलेक्स पाईप उद्योग समूहाने गोरगरीब रुग्णासाठी ४ डायलिसिस यंत्रणा दिल्याबद्दल विश्वस्त संदीप जगताप यांनी त्यांचे आभार मानले
सूत्र संचालन शिवराज झगडे यांनी केले. आभार अड् अशोक संकपाळ यांनी मानले
याच कार्यक्रमात मार्तंड देव संस्थान च्या वतीने भक्तनिवास मधील एका कक्षाला शाहीर सगनभाऊ जेजुरीकर असे नामकरण करण्यात आले.