प्रा उमेश गवळी यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्यांची जडणघडण – प्राचार्य डॉ राजेंद्र झुंझारराव
जेजुरी,( प्रतिनिधी ) दि. ५ प्रा उमेश गवळी हे आदर्श प्राध्यापक उत्तम सहकारी,सेवाभावी वृत्तीने काम करण्याची पद्धत,राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट योगदान,शिक्षक पतसंस्थेत उल्लखनीय कार्य,तसेच प्रचंड आत्मविश्वासु व जबाबदारी पेलणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे विद्यार्थ्यांची जडणघडण झाली असल्याचे मत प्राचार्य डॉ राजेंद्र झुंझारराव यांनी व्यक्त केले.
मोडर्ण महाविद्यालय पुणे येथे भौतिक शास्त्राचे प्रा उमेश कृष्णराव गवळी यांच्या सेवा पूर्तीच्या कार्यक्रमावेळी डॉ राजेंद्र झुंझारराव बोलत होते. प्रा उमेश गवळी हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. एच एस सी बोर्डाचे नियामक,मुख्यनियामक,पेपरसेटर,सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष,सचिव पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे. सेट नेट,नीट,जीई ,आदी परीक्षांसाठी मार्गदर्शनवर्ग ,प्रश्नपेढी निर्मिती,तसेच राज्यशासन व केंद्रशासनासाठी त्यांनी काम केले आहे. सध्या राष्ट्रीय ओबीसी महामंडळाचे पुणे शहर कार्यध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ,तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेटचे सदस्य डॉ हर्ष गायकवाड,प्रा.पी एम सांबारे,प्रा.अजितसिंग ठाकूर,डॉ .विजय गायकवाड,प्रा. सुनील डोईफोडे,प्रा.सुभाष कारेकर,शिवाजी सोनवणे,सुरेश भोसले,यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा उमेश गवळी यांनी प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रा जोत्सना एकबोटे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य झुंझारराव उपप्राचार्य संजय ठेंगडी मोडर्ण कॉलेजचे आजी माजी प्राचार्य व प्राध्यापक वर्गाच्या सहकार्या मुळे गेली एकोणतीस वर्षे संस्थाच्या प्रगतीसाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी तसेच अध्यापनाची,संस्था ,कॉलेज व विद्यार्थी यांची सेवा करण्याची संधी आपणास मिळाली असल्याचे सांगितले.