प्राचार्य डॉ. शिवाजीराव ढगे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार,
पुणे, दि. ७ ( प्रतिनिधी )
भारतरत्न मौलाना आझाद सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील प्राचार्य डॉ. शिवाजीराव ढगे यांना दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनानिमित्त ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील मा. कुलगुरू डॉ.एस. एन. पठाण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.अमानत शेख, मा. नगरसेविका हसीना इनामदार, पुणे महानगरपालिका, पुणे, मा. आमदार महादेव बाबर, मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. बी. शेख, श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कुकडी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. आमदार राहुल दादा जगताप पाटील, कुकडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मा. डॉ. प्रणोतीमाई जगताप पाटील व सावित्रीबाई कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शांतीलाल घेगडे यांनी अभिनंदन केले.