पुरंदर विमानतळाला बाधितांचा विरोधच … इंचभर ही जागा देणार नाही – चेतन मेमाणे

सासवड दि.३ (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील होऊ घातलेल्या विमानतळाला पारगावकरांचा विरोध होता, आहे आणि राहील आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही एक इंचही जमीन विमानतळाला देणार नाही. आशी संतप्त प्रतिक्रीया विमानतळ बाधित पारगाव मेमाणेचे उपसरपंच चेतन मेमाणे यांनी दिली
मेमाणे पुढे म्हणाले, नुकतेच विमानतळासाठी नविन जागेचा केलेला सर्व्हे रद्द करण्यात आला व पुन्हा जुन्याच जागी विमानतळ मुख्यमंञी, उपमुख्यमंञी, जिल्हाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पुन्हा होणार असल्याचे व विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याच्या सुचना दिल्याचे सांगितले जात आहे.
पारगाव, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, वनपुरी येथे जुन्या जागेत न होता बारामती, दौंड व पुरंदरच्या सिमेवर होणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विमानतळ पुरंदर तालुक्यातच नको या भावनेतुन लढणा-या शेतक-यांना एक सुखद धक्का बसला होता. पुन्हा जुन्या जागेतच विमानतळ तर होणार आसल्याने या भागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
त्यामुळे आम्ही जीव गेला तरी चालेल विमानतळाला एक इंचही जागा देणार नाही. आमचे कष्टाने फुलवले संसार काय उघड्यावर टाकणार काय? आजपर्यत आमची कूणाला चिंता नव्हती आम्ही कष्टाने बागा फुलविल्या आहेत. त्यामुळे पैशाच्या अमिषाने आईला कोण विकता का? ज्यांना विमानतळ पाहीजे त्यांची बाधित गावात जमीन तरी आहे का? स्वताच्या फायद्यासाठी आमची राखरांगोळी करणार का?
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आम्ही शांत होत पण याचा अर्थ विरोध मावळला असा समजु नाये. अनेक आंदोलने केली, विरोध केला आणि आता परत आमच्या जमीनी बळकाविण्याचा प्रयत्न केला तर आणखी दुप्पटीने आम्ही त्याचा विरोध करू आंदोलन उभे करणार असल्याचे चेतन मेमाणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page