पुरंदर राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष संदीप चिकणे अजित पवारांबरोबर…मुंबईत मेळाव्यालाही हजेरी
जेजुरी, दि. ५ आज दि. ५ जुलै रोजी अजित पवार आज शरद पवार या दोन्ही गटांतील मुंबईतील शक्तिप्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या शक्तीप्रदर्शनात पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांबरोबर थांबणे मान्य केले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी मात्र अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेऊन आज मुंबईत अजितपवारांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काम करीत आहे. यामुळे देशाचे नेते आदरणीय पवार साहेबाबद्दल आपणास आदर आहेच. मात्र
अजित दादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आपण दादांबरोबर काम करीत आलो आहोत. अजित पवार हेच एकमेव राष्ट्रवादीत सक्षम नेतृत्व आहे.तरुण वर्गात अजित पवारांची क्रेझ आहे. प्रशासन चालवणे, काम करण्याची दादांची पद्धत सरळ आणि स्पष्ट आहे. सर्वसामान्यांना न्याय दादांच्या माध्यमातूनच मिळू शकतो म्हणून आपण अजित दादांबरोबर आहोत. तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्या कडून आपल्याशी संपर्क साधला जात असल्याचे श्री संदीप चिकने यांनी सांगितले.
आज दादा उपमुख्यमंत्री झाले. भविष्यात अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यात शंकाच नाही..दादांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत.