पुरंदर मध्ये विमानतळ होणारच,- विजय शिवतारे पेशवे पेट्रोलियम चे दिमाखात उदघाटन..
जेजुरी दि.३० राज्याच्या १४ जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाचे ठरू शकणारे आणि पुरंदरचा कच्चा माल आणि विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान साहित्य आयात निर्यात करण्यासाठी माझ्या प्रयत्नातील पुरंदरचे विमान तळ होणारच अशी ग्वाही जेजुरी येथिल ख्यातनाम उद्योजक सचिन पेशवे यांच्या पेशवे पेट्रोलियम च्या उदघाटन सोहळ्यात माजी राज्य मंत्री विजयशिवतारे यांनी दिली.
जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्यामकाका पेशवे यांचे हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
पुणे जेजुरी महामार्गावर सचिन पेशवे सारख्या युवकाने उद्योजक क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे ही शिवतारे यांनी म्हंटले आहे.
या उदघाटन सोहळ्या करीता भाजप जिल्हाउपाध्यक्ष राहुल शेवाळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाऊ कामथे जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे,पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गिरीश जगताप,सचिन लंबाते, वामनतात्या जगताप, नगरसेवक सचिन सोनवणे, उद्योजक रवी जोशी,अजिंक्य देशमुख, उन्मेष जगताप नितीन कुलकर्णी, सेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे, समाजसेवक भगवान डीखळे, इंडियन ऑईलचे नितीन वशिष्ठ इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते