पुरंदर मध्ये पत्रकार भवन कामाचा पायाभरणी समारंभ संपन्न….
जेजुरी, दि. २२ पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने होत असलेल्या सुसज्ज अशा इमारतीचा पायाभरणी समारंभ पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला व प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली. यावेळी पत्रकार निलेश जगताप यांनी सपत्नीक पुजा विधी केले तर कार्यक्रमाचे पौराहीत्य पत्रकार व खंडोबा देवाचे पुरोहित प्रकाश खाडे यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य बी. एम. काळे, जिल्हा प्रतिनिधी प्रकाश फाळके, जवळार्जुनचे सरपंच सोमनाथ कणसे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रवीण नवले,सचिव अमोल बनकर,कार्यकारिणी सदस्य समीर भुजबळ, सोशल मिडीया सहसचिव हनुमंत वाबळे, पुष्कर खाडे, ठेकेदार प्रमोद इंगळे ,नारायण शिवरकर, आदित्य रोकडे, विश्वास बनकर,किरण रोकडे,वैभव रोकडे आदी उपस्थित होते.
गेले एक वर्षभरापासून पुरंदर तालुक्यामध्ये पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प सर्व पत्रकारांनी केला व यासाठी लोकवर्गणीतून ६ गुंठे जागेची खरेदी केली व आता याच ठिकाणी सुमारे तीन ते चार कोटी रूपये खर्चाच्या इमारतीच्या बांधकामास सुरूवात केली.
पुरंदर तालुक्यात पालखी महामार्गालगत उभी राहणारी ही वास्तु पुरंदर तालुक्याचा नावलौकिक वाढविल असा विश्वास व्यक्त करत श्रावण महिन्यात, पायाभरणी केलेल्या या इमारतीचे काम यापुढे दोन वर्षाच्या काळात पुर्ण करण्याचा आमचा संकल्प असल्याचे बी. एम. काळे यांनी सांगितले व इमारतीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार भवन इमारत बांधत असताना या इमारतीमध्ये स्वागत कक्ष, उपहारगृह, विश्रामगृह, सुसज्ज वाचनालय, व्यायाम शाळा, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कक्ष, मीटिंग हॉल, ऑफिस ,लिफ्ट सुविधा, मुलाखत कक्ष व सांस्कृतिक हॉल यासारखे अनेक दालने असून संपूर्ण इमारत ही सोलर सिस्टिम वरती कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी सांगितले.
फोटो सोबत पाठवला आहे
शिवरी (ता.पुरंदर) येथे पत्रकार भवन बांधकाम पायाभरणी समारंभ प्रसंगी उपस्थित पत्रकार बांधव.