पुरंदर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी एस मेमाणे यांची होणार चौकशी
सासवड-
पुरंदर पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी पी एस मेमाणे हे त्यांचे कर्तव्ये व प्रशासकीय जबाबदाऱ्या नियमानुसार पार पाडत नाहीत.त्यांनी विस्ताराधिकारी पदोन्नती मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केली.व शासनाच्या सोई,सुविधा,भत्ते यांचा वैयक्तिक व आर्थिक लाभ घेतल्या महाराष्ट्र राज्य ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुरंदरचे अध्यक्ष सुदाम खेडेकर यांनी पुरंदरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला होता.
पी एस मेमाणे हे पारगांव (ता.पुरंदर)येथील स्थानिक रहिवासी असून कार्यालयीन वेळेत ते स्वतःचे कर्तव्ये व प्रशासकीय जबाबदारी नियमानुसार पार पाडत नाहीत.ते एका राजकीय पक्षाचे काम राजरोसपणे करतात.महाराष्ट्र नागरिक सेवा शर्तीचा भंग करत महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांची पायमल्ली करतात.
केंद्र शासनाच्या नियोजित आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला देखील मेमाणे विरोध करतात.प्रकल्प बाधितांच्या भावना भडकावतात,सभा घेतात,वैयक्तिक संपर्क करुन प्रकल्पालाच्या कामात अडथळा आणतात.यासारख्या गंभीर घटनांची दखल घेत
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मेमाणेंना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई प्रस्तावित केली होती.
मात्र प्रशासनाने (जुन्नर तालुक्यात) तात्पुरती बदली करत अतिशय तकलादू व जुजबी कारवाई करत मेमाणेंना क्लिनचिट दिली.
अल्पावधितच प्रशासनाने मेमाणेंची जुन्नर तालुक्यातून पुन्हा पुरंदर तालुक्यात सोईस्कर रित्या बदली केली.सदर बदली प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने केली का ?
याबाबतचा क्लिनचिट अहवाल देखील संघटनेला मिळावा.अन्यथा ११ ऑगस्ट २०२२ रोजी पुरंदर तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुका ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष सुदाम खेडेकर यांनी दिला होता.
त्यानुसार पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग मेमाणे यांची अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यानुसार चौकशी करुन अहवाल विनाविलंब सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच भारत देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने ११ तारखेचे ग्राहक हक्क संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित करुन प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.