पुरंदर तालुक्यात बारावीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम…
जेजुरी, दि. २५ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून पुरंदर तालुक्यातील सर्व उच्चमाध्यमिक विद्यालयांनी या निकालात घवघवीत यश मिळवून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
पुरंदर तालुक्यात सोळा माध्यमिक विद्यालये असून विज्ञान,वाणिज्य,व कला शाखेंचा बारावीचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. महाविद्यालयांचा निकाल पुढील प्रमाणे,
महात्मा जोतीराव फुले विद्यालय शिवरी १०० टक्के, लि.र शहा विद्यालय नीरा ८८.२३ टक्के, पंचक्रोशी शेतकरी विद्यालय ९७.७७ , एम ई एस वाघिरे विद्यालय ८९.६१, ( विज्ञान ९३.७५,वाणिज्य ९७.१४,कला ८३.३३ ) केदारेश्वर विद्यालय काळदरी – ९५.४५, जिजामाता जुनियर कॉलेज जेजुरी – ९९.६३ टक्के ( विज्ञान १०० टक्के, वाणिज्य ९८ टक्के व कला १०० टक्के.) रीसे पिसे माध्यमिक विद्यालय रीसे १०० टक्के, श्री शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल सासवड १०० टक्के, जनाबाई ओव्हाळ विद्यालय हिवरे – ६९.७६ , ( कला ४५ टक्के, व वाणिज्य ९१.३० ) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय परिंचे ९६.७७ टक्के ( विज्ञान १०० टक्के,कला ९१.६६ टक्के , वाणिज्य ९६.८७ ) वाघिरे महाविद्यालय सासवड ९५.२० टक्के, ( विज्ञान ९६.८०,कला ९१ .१५ ,व वाणिज्य ९५.१७ ) किलाचंद विद्यालय नीरा ९३.८० टक्के, ( विज्ञान ९८.६३ , कला ८५ टक्के,) महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे- १०० टक्के, पुरंदर ज्युनियर कॉलेज सासवड ९१.१७ ( विज्ञान ९५.७७,कला ७९.२२,वाणिज्य ७९.२०,) ए सी हुंडेकरी विद्यालय जेजुरी – ९८.३६, ( विज्ञान १०० टक्के,कला ९१ तर वाणिज्य १०० टक्के ) डॉ शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे विज्ञान ९७.३६ व कला ८० टक्के सर्व यशस्वी महविद्यालय व विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ,पुरंदर तालुका मुख्याध्यापक,शिक्षक,क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.