पुरंदरच्या विमानतळ व गुंजवणी प्रश्नाचे सत्य जनतेला कळाले पाहिजे
माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांना संभाजी झेंडे यांचे खुले चर्चेचे आवाहन
जेजुरी, दि. २२ गुंजवणी धरण, विमानतळ ,आंतरराष्ट्रीय बाजार व पवार कुटुंबावरती टीका हे विजयराव शिवतारे यांचे आवडते विषय असून यामध्ये विमानतळ मंजुरी या विषयाशी त्यांचा १ टक्के तर सोडा पण सुईच्या टोकाएवढाही संबंध नाही तर गुंजवणीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले व उर्वरित ५ टक्के काम करण्यासाठी तुम्ही आंदोलन केले होते यामुळे पुरंदरच्या जनतेला या तिन्ही विषयातलं सत्य कळालंच पाहिजे यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना राष्ट्रवादीची नेते सेवानिवृत्ती सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे.
यावेळी झेंडे प्रचंड आक्रमक झाले होते त्यांनी आता चर्चा नको तर तुम्ही सांगाल ती तारीख, तुम्ही सांगाल ती वेळ, तुम्ही सांगाल ते ठिकाण अगदी तुमचे गाव परींचे गाव सुध्दा चालेल किंवा सासवड मात्र पुरंदर हवेलीच्या प्रत्येक गावातील १० समजदार व्यक्ति प्रत्येक मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे १० कार्यकर्ते, सर्व वकील, डॉक्टर, समाजसेवक, सर्व पत्रकार बंधु-भगिनी असे १००० लोक आणि स्टेजवर केवळ आपण दोघेजण माईकसह ,अट मात्र एकच रेटून खोटं बोलायचं नाही व शिवराळ भाषा वापरायची कारण समोर सुसंस्कृत लोक व माता भगिनीही असणार आहेत. एकच गोष्ट गेली १४ वर्षे तुम्ही सांगत आहात. त्यातील ५ वर्षे तुम्ही आमदार होता व ५ वर्षे राज्यमंत्री होतात त्यामुळे पुरंदरच्या जनतेला या तिन्ही विषयातलं सत्य कळालंच पाहिजे.
नुकताच राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा वाढदिवस साजरा झाला यावेळी झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी त्यांनी
राष्ट्रवादीवाल्यांचा DNA तपासावा लागेल असे म्हणाले होते यावर झेंडे यांनी याबाबत सडतोड उत्तर दिले आहे .
DNA म्हणजे एखाद्या व्यक्तिच पितृत्व किंवा पिता नक्की कोण ही बाब संशयास्पद असते तेव्हा अशा प्रकारची टेस्ट केली जाते. त्यामुळे या एका वाक्यामुळे माझ्या व आम्हा सर्वांच्या केवळ भावनाच दुखावल्या गेल्या नाहीत. तर विजयराव शिवतारे तुम्ही राष्ट्रवादीच्या सर्व एक लाख सात हजार मतदारांच्या हयात असलेल्या व नसलेल्या आई-वडिलांच्या चारित्र्यावरच संशय निर्माण केलाय हा अतिशय निंदनीय विषय आहे. मला आणि तुम्हांला व सर्वांनाच सुसंस्कृत असाल तर आपले आई-वडील देवासमान असतात. काही किर्तनकार तर किर्तनात सांगतात. देवळात जाऊन देवाच्या पाया पडण्यापेक्षा आई- वडिलांच्या पाया पडा व हीच आपली संस्कृती आहे. तर विजयराव तुम्हीही बरेच वर्षे राष्ट्रवादीत होता तालुका सेनाप्रमुख दिलीप आबा होते. आणखीही बरेचजण आहेत. म्हणजे तुमची सर्वांचीच पितृत्वाची Test करावी लागेल.
याच समारंभात शिवतारे यांनी बोलताना हे सरकार बनवण्यामध्ये माझाच हाथ असून एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये बंडाची बीझे मीच पेरली असल्याचे सांगितले होते यावर बोलताना झेंडे यांनी ते राज्य पातळीवरील नेते आहात असा भास होतो एवढचा मोठ्या ताकदीच्या माणसावर मी टिका करणे योग्य नाही. कारण मी पुरंदर हवेलीचा केवळ एक सर्वसामान्य नागरिक व पुरोगामी विचारसरणीच्या माझ्या राष्ट्रवादी पक्षाचा छोटासा क्रियाशील कार्यकर्ता आहे. मला तर वाटायला लागलंय कर्नाटक, मध्यप्रदेश मिझोराम आणि गोवा ही सरकारेही पाडण्याचे कानमंत्र तुम्हीच दिले असावेत असाही टोला त्यांनी लगावला.
संभाजीराव झेंडे यांनी केलेली शिवतारे यांच्यावरील टीका पाहता पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचे चैतन्य आले असून अशाच सुसंस्कृत पद्धतीने शिवतारे यांना उत्तर देण्याची गरज असल्याचे कार्यकर्ते खाजगीत बोलू लागले आहेत .