पुण्याचे खा.गिरीश बापट ही नाराज ? स्वपक्षासह आजच्या राजकारणावर स्पष्टच बोलले
“मी एवढे वर्षे राजकारण केलं पण कधी कुणावर व्यक्तीगत टीका केली नाही. मी जी कामे केली ती नि:स्वार्थपणे केली पण सध्याचे राजकारण पाहता मी वैयक्तिकरित्या माझ्या पक्षांसह सर्वांवर नाराज आहे.” असं मत पुण्याचे खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सध्याच्या राजकारण आणि राजकारण्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या राजकारण्यांनी कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता कामं करायला हवीत. पण सध्याचे राजकारणी विनाकारण खर्च करतात, जेवण देतात, फ्लेक्स लावतात पण काम काहीच करत नाहीत. आम्ही एवढ्या वर्षात नि:स्वार्थपणे काम केले पण कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. त्यामुळे मी माझ्या पक्षांसह सर्वांवरच नाराज आहे. पण हे माझं व्यक्तिगत मत आहे अशी खंत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे
दरम्यान, मागच्या दोन महिन्यात राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला बंड केलं आणि २०१९ मध्ये शिवसेनेनी युती तोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन असं म्हणत खरंच पुन्हा सत्तेत येऊन दाखवलं. या काळात अनेक राजकीय घटना घडल्या. विरोधातून लढलेल्या सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची युती झाली. महाविकास आघाडीत अडीच वर्षातच खटके उडाले आणि शिंदेंनी सेनेसोबत बंड केले. त्याचबरोबर नव सरकार सत्तेत आलं. पण या सगळ्या राजकारणार जेष्ठ नेते आणि भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारण्यांनी कोणताही स्वार्थ मनात न ठेवता काम केलं पाहिजे पण सध्याचे राजकारणी काम करत नाहीत, फक्त फ्लेक्स लावतात, जेवण देतात. त्यामुळे मी व्यक्तिगतपणे नाराज आहे. अशी नाराजी बापटांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या सध्याच्या राजकारणावरील नाराजीवर भाजपकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे