पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे रुंदीकरण अन्यायकारक जेजुरीतील अन्यायग्रस्तांचे खा.सुळेना निवेदन, मार्ग काढण्याचे आश्वासन
जेजुरी, दि.२५ नियोजित पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाकरिता जेजुरी शहरामध्ये सर्व्हेक्षण व मोजणीचे काम सुरु आहे.शहरातून जाणाऱ्या व अस्तित्वात असणार्या रस्त्याच्या मध्यभागातून दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या खुणा न करता केवळ उत्तरेकडील बाजूला रुंदीकरणाच्या खुणा करून केवळ एकच बाजूची जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याने नागरिक व व्यावसायिकांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या एकतर्फी मोजणीला रहिवाश्यांनी विरोध केला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान रुंदीकरण व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे संबधित विभागाला देण्यात आले आहे. मात्र शासन पातळीवर समाधान कारक उत्तरे न देता टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जात असल्याने शासनाविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबधित विभाग नागरिकांचे एकूण न घेता हरकती फेटाळून लावीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात नाराचीचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर दि २४ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून अन्यायग्रस्तानी निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले.
नियोजित पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जेजुरी शहराच्या बाहेरून बाह्यवळण तयार करावे असा ठराव यापूर्वी जेजुरी नगरपालिकेने केला होता. याचा विचार या नियोजित राष्ट्रीय महामार्गात केला गेला नाही. तसेच सात वर्षापूर्वी ७ जुलै २०१५ रोजी महामार्गाचे रुंदिकरण करताना जेजुरी शहराच्या गावाठांतून जाणाऱ्या रस्त्याचे दोन्ही बाजूला खुणा करूनही केवळ उत्तरेकडील मालमत्ता पाडण्यात आल्या. तसेच सध्या राष्ट्रीय महामार्गासाठी सर्व्हेक्षण व मोजणी सतत सुरु असून आत्ता हि केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूसच रुंदीकरणासाठी खुणा केल्याने ग्रामस्थांच्यात संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे. हा एकतर्फी निर्णय असून अस्तिवात असणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गाच्या मध्यातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करून रुंदीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालक राष्ट्रपती पासुन ते नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.
केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील नागरिकांवर अन्याय होत असून त्यामुळे अनेकांच्या व्यवसायावर संकट कोसळले आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजूला २६ मीटर रस्त्यासाठी समान खुणा करूनच रस्त्याचे रुंदिकरण करावे .अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबतचे अन्यायग्रस्त नागरिकांना देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान यांना असत आम्हावरच अन्याय होतोय, उत्तेकडील बाजूची जागा अधिग्रहण केल्यास जीवन जगण्याचे साधन उरणार नाही त्यासाठी आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी निवेदने दिली आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार,सुप्रिया पवार,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी आदींना हि निवेदने देण्यात आले आहे.
या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यास रस्त्याच्या उत्तरेकडे राहणाऱ्या नागरिकांचा विरोध नाही मात्र रस्त्याच्या दक्षिणेकडील मालमत्ता वाचविण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जातोय, सासवड व नीरा या गावाच्या बाहेरून बाह्यवळण करण्यात आले आहे. मात्र जेजुरीतुनहि बाह्यवळण असताना हा बाह्यवळण मार्ग रद्द करून गावातूनच राष्ट्रीय महामार्ग नेह्ण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केला जात आहे. जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचे तीर्थक्षेत्र असून वर्षाकाठी येणाऱ्या दहा ते बारा यात्रा,तसेच दररोज येणारे हजारो भाविक यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते,यासाठी गावाबाहेरून रस्त्या गरजेचा असताना शहरातूनच राष्ट्रीय रस्त्याचा अट्टाहास कोणासाठी असा प्रश्न अन्यायग्रस्त नागरीकानी उपस्थित केला आहे.
रस्ता प्राधिकरणाचे सतत प्रसिद्ध होणारे राजपत्र,त्यावरील हरकती,नोटीसा यामुळे येथील नागरिक भयग्रस्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाला विरोध नाही मात्र एकाच बाजूवर अन्याय नको, पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूची जागा अधिग्रहण करावी ,शहरातून हा रस्ता लादला जात आहे, सासवड व नीरेला बाह्यवळण होत असेल तर जेजुरी शहराबाहेरून बाह्यवळण करून जेजुरी करांना न्याय द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी असून रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूला अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.