पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक च्या उपाध्यक्षपदी युवराज जगताप यांची निवड…
जेजुरी, दि.२० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या वेळी पुणे जिल्ह्यातील तालुका युवक अध्यक्ष आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले..
याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे, खासदार मा. श्रीनिवास पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री मा. आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री मा. आमदार एकनाथ खडसे, आमदार मा. बाळासाहेब पाटील, आमदार मा. अशोक पवार, माजी आमदार कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, पुरंदर व हवेली तालुक्यातिल मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संहमतीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक च्या उपाध्यक्ष पदी श्री युवराज जगताप यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंतराव पाटील आणि
*प्रदेश युवकचे अध्यक्ष श्री मेहबूबभाई शेख,जिल्हा राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष श्री स्वप्नील गायकवाड, यांच्या हस्ते देण्यात आले .
त्यावेळी उपस्थित पुरंदर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी श्री संभाजीराव झेंडे ,प्रदेश प्रवक्ते श्री विजयराव कोलते,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामआप्पा इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबूसाहेब माहुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील,
पुरंदर तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज भैय्या जाधव, जेजुरी नगरसेवक श्री जयदीप बारभाई ,
निरा कुर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री गणेश होले, उपस्थित होते ..