पिंपरे येथे अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला सुपारी देऊन नवऱ्याचा काटा…. आरोपींना २ तासात अटक, जेजुरी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी…
जेजुरी, दि.२२ पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे खुर्द येथे काल शुक्रवारी झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तर या खुनात मयताच्या पत्नीचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे . या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासात मयताच्या पत्नीसह नऊ जणांना ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात अनैतिक संबंधातून पत्नीनेच सुपारी देऊन पतीचा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी माहिती दिली आहे.
पिंपरे (खुर्द) येथील बेंदवस्तीत काल शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री आठ वाजलेच्या चे सुमारास हरीशचंद्र बजरंग थोपटे (वय ४२ वर्षे ) यांचा कोणीतरी अज्ञाताने धारदार शस्त्राने कपाळावर, गालावर, हनगुटीवर, गळ्यावर वार करून खून केला होता या प्रकरणी मृताचा भाऊ सतिश बजरंग थोपटे यांनी तक्रार दिली होती.
जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी प्रणव ढावरे रा. पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली. यामध्ये मयत थोपटे याची पत्नी पुजा हरीशचंद्र थोपटे हीचे मदतीने आरोपी धीरज उर्फ बंटी संजय ढावरे, निकेश विरेंद्रसिंह ठाकुर, हिवरकरमळा व त्याचे इतर सिध्दांत संभाजी भोसले रा. जेजुरी लवथळेश्वर, सुरेश कांतीलाल कडाळे रा. पाडेगाव फार्म ता. खंडाळा, लखन सुर्यवंशी याचे सोबत कट रचुन खुन करण्याची सुपारी देवुन, खुन केला. असल्याचे सांगितले.हा खून करताना स्वरूप रामदास जाधव, विशाल चव्हाण, शुभम मचारे यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले, या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग आनंद भोईट यांचे मागर्दर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे याचे सुचनेप्रमाणे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, म.पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार, पोलीस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे आर. एम. साबळे, सर्जेराव पुजारी, सह फौजदार चंद्रकांत झेंडे, संदिप मोकाशी, पो.ना. सोमेश राउत, विठठल कदम, बनसोडे, मदने, राजेंद्र भापकर, नानासाहेब कांरडे, आणासाहेब देशमुख, संजय ढमाळ, रेणुका पवार, निलेश करे, सदीप भापकर, प्रविण शेडे, अमोल महाडीक, निलेश जाधव, संदीप पवार, भरत आरडे, विनोद हाके, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भोर यांचे कार्यालयाकडील पो. हवा विशाल रासकर, निलेश सटाले, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन पुण ग्रामीण शाखेचे याचेकडील पो.स. ई. ननावरे, पो. हवा. काचन पो. कॉ धीरज जाधव, पो.हवा. कारंडे असे यांनी मिळून केली आहे.