पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवला अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानं वर्तवलेल्या (IMD) अंदाजानुसार 29 ऑगस्ट ते ते 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळं यंदा गणेशोत्मवामध्ये नागरिकांना पावसाचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनाबरोबरचं राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचं पुनरागमन होणार आहे