पांडेश्वर ग्रामपंचायत सरपंचपदी किशोर लवांडे..
पुरंदर दि.३ पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर रघुनाथ लवांडे यांची बिनविरोध निवड झाली.
वर्षांपूर्वी पांडेश्वर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी राहिल्याने सरपंच पदाच्या पाच वर्षांच्या काळात अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस ला आणि अडीच वर्षे काँग्रेसकडे सरपंच पद देण्याचे निश्चित झाले होते.
निवडणुकीनंतर पहिली सव्वा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शैलजा हनुमंत शिंदे यांना सरपंचपद देण्यात आले होते.त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसचे किशोर लवांडे यांना संधी देण्यात आली आहे.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच श्री लवांडे यांचे अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सरपंच उत्तमराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरंदरचे आ.संजय जगताप यांच्या हस्ते ही नवनिर्वाचित सरपंच श्री लवांडे यांचा सत्कार करण्यात आला. आ जगताप यांनी त्यांना शुभेच्छा ही दिल्या
यावेळी माजी सरपंच शैलजा शिंदे, प्रताप रासकर, उपसरपंच सौ.शेंडगे ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ सोनवणे, शैलेश रोमन, वैभव ठिकोले, सौ.नाळे, सौ. शिनगारे, मुगुट शेंडगे, उद्योजक धैर्यशील शिंदे आदी उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच श्री लवांडे यांनी यावेळी म्हटले आहे .