पत्रकार भवन स्वप्नपूर्ती संकल्प मेळावा…
पुरंदर पत्रकार भवनाचा हा प्रकल्प इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल- शरद पवार.
सासवड, दि. ७ पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाने हा जो सर्वसोईयुक्त असा पत्रकार भवनाचा महत्वाकांक्षी व मोठा प्रकल्प हाती
घेतला आहे. त्याचे डिजाईन आणि संकल्पना पाहता राज्यभरातील पत्रकारांसाठी हे पत्रकार भवन आदर्श ठरेल, असा विश्वास माजी कृषीमंत्री शदर पवार यांनी व्यक्त केला.
शिवरी(ता.पुरंदर) येथे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ नियोजित पत्रकार भवन स्वप्नपुर्तीचा संकल्प मेळावा संपन्न झाला.त्यावेळी माजी केंद्रीय
कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप अशोक पवार, पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, अशोक टेकवडे, विजय कोलते, सुदाम इंगळे, विराज काकडे, माणिक झेंडे, पुष्कराज जाधव, दत्तात्रय कड, प्रमोद जगताप आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विशेषत: जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवनाच्या इमारती उभ्या राहिल्यात काही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील या प्रकल्पाबाबत मी येता येता महसुल अधिकाऱ्यांशी चर्चा केली ही जागा योग्य असुन काही परवानग्या बाकी
असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय परवानगी पुर्ण करुन घ्याव्यात व वेळेत काम पुर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन या ठिकाणी तालुक्यातील पत्रकांसोबतच राज्यभरातुन येणाऱ्या पत्रकारांसाठी होणार असलेल्या सुविधा पाहता राज्यातील सर्व पत्रकारांसाठी पुरंदर मधील होणारे हे नविन सुसज्य पत्रकार भवन आदर्श ठरणार आहे. हे बोलताना त्यांनी पत्रकार संघाच्या कामाचे आवर्जुन कौतुक केले.
यावेळी पत्रकार भवनासाठी पाठबळ दिल्याबद्दल दत्ता झुरंगे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे,
अभिजीत जगताप, सतिश उरसळ, शरद पाबळे, अरूण कांबळे आदिंची भाषणे झाली.
बाळासाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले. नितीन राऊत यांनी सुत्रसंचालन तर पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी आभार मानले.