निरेत चोरट्यांचा धुमाकूळ, आठवडाभरात पाच मोटारसायकल गायब…..

पुरंदड तालुक्यातील नीरा येथून मुख्य बाजारपेठेतून गेल्या आठवडाभरात चोरट्यांनी पाच मोटरसायकल चोरून गायब केल्या आहेत

तालुक्यातील मोठ्या  बाजारपेठेचे गाव म्हणून ओळख असलेल्या निरेमध्ये मागील  काही दिवसात  तब्बल पाच मोटरसायकल वर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

यामध्ये भिवा वळकुदे यांची बजाज डिस्कवर क्र एम एच १२ एम व्ही ०७६४ ही मोटरसायकल राधाकृष्ण मंगल कार्यालय येथून पहाटेच्या सुमारास चोरीला गेली आहे. अशाच काही मोटरसायकली मागील काही दिवसात प्रकाश बेसके यांची होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्र एम एच १२ एफ जी ६७१८ कुलदीप पवार यांची होंडा कंपनीची स्प्लेंडर क्र एम एच १२ एफ यु ९२९१ अमर घुले यांची होंडा कंपनीची पॅशन क्र एम एच १२ एच पी ५६०० तसेच विशाल कड यांचीएम एच ११ ६३३३ क्रमांकाची स्प्लेंडर गाडी निरा बाजारपेठेतून चोरीस गेली आहे.

  तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निरेमध्ये संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याची ग्रामस्थांची मागणी होती. दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात देखील मोबाईल चोरी पाकीटमारी व  मंगळसूत्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नीरेमध्ये परप्रांतीयांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आपणास पहावयास मिळतो रोजगाराच्या शोधात नीरेमध्ये आलेले परप्रांतीय खरेच रोजगारासाठी आले आहेत का? याची शहनिशा झाली आहे का?  ‌ व ते ज्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहतात तेथील घर मालकांनी याची पोलीस दप्तरी नोंद केली आहे का ? हे पाहणे गरजेचे बनले आहे. 

हा सर्व घटनाक्रम पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी याची आता तरी गांभीर्याने दखल घ्यायला हवी अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page