जेजुरीत नाट्यगृह, उद्यान, होळकर व पेशवे तलाव सुशोभिकरण कामे लवकरच सुरु होणार – आमदार संजय जगताप

जेजुरी नगरपरिषेदेत आढावा बैठक

जेजुरी, दि.८ जेजुरी शहराच्या विकासासाठी नाट्यगृह, उद्यान, ऐतिहासिक पेशवे व होळकर तलावाचे सुशोभिकरण आदी कामे लवकरच मार्गी लागणार आहे. नाझरे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यासाठी नवीन मोटार बसविण्यात येत असून लवकरच जेजुरी शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच जेजुरी शहराला असून वीर धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन योजनेचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. सदर आराखडा डिसेम्बर महिन्यात शासनाकडे सादर होवून एक वर्षाच्या आता पूर्ण क्षमतेने जेजुरी शहराला वीर धरणातून पाणी पुरवठा होणार असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
जेजुरी नगरपालिका सभागृहात आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले,माजी नगरध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक सचिन सोनवणे,महेश दरेकर,अजिंक्य देशमुख रुक्मिणी जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, सुशील राउत, बाळसाहेब जगताप तसेच पालिकेच्या अधिकारी नेहा गाजरे , संगीता येलमेवाड, प्रमिला सरवदे , बाळसाहेब खोमणे, राजेंद्र गाढवे,कन्हेया लाखे,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप पुढे म्हणाले २०१७ साली २ कोटी ६५ लक्ष रुपये वीज बिलाची थकबाकी होती. तत्कालीन सरकारकडे दंड, व्याज कमी करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. व उर्वरित वीजबिल भरण्यात आले. मात्र पुन्हा दंड व व्याज माफ न होता ते थकबाकीत आले. तो प्रश्न सोडविला जाईल . जेजुरी शहर तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने आरोग्य व स्वच्छता यंत्रणेवर भार पडतो असे असताना गेली तीन वर्षापासून यात्रा अनुदान उपलब्ध झाले नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील साडे चार कोटी रुपयांची ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावाचे सुशोभिकरण,रेलिंग आदी विकास कामे लवकरच सुरु होतील.
जेजुरी शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर वेळीच भरणे आवश्यक आहे. मालमत्ता करा बाबतीत काही त्रुटी असतील तर नागरिकांनी पन्नास टक्के कर भरून त्रुटी बाबत अर्ज करावा ,त्या त्रुटी दूर करून उर्वरित कर भरण्यासाठी टप्पे करून द्यावेत अशा सूचना पालिका प्रशासनाला आमदार संजय जगताप यांनी केल्या.

जेजुरी शहरातील पाणी टंचाई, याबाबत केलेले नियोजन,वीर धरणावरील नवीन पाणी योजना, शासनच्या अनुदानातून सुरु असलेली विकास कामे,वाहनकर ठेका,आठवडा बाजार ठेका, आठवडा बाजारातील नवीन ओट्यांचे लिलाव,चतुर्थकर आकारणी,संभाजीराजे व्यापार संकुल,पंतप्रधान आवास योजनेसाठी जागा, शहरातील स्वच्छता,आरोग्य यावर उपाययोजना तसेच गावात भटके कुत्रे व डुकरांचे वाढते प्रमाण, चिंचेचे बागेतील स्वच्छता, स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान आदी विषयावर मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी माहिती दिली. 

 जेजुरी पालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता कर हि मोठी बाजू असून ८ कोटी ३७ लक्ष रुपयांची मालमत्ता कर मागणी असून आत्ता पर्यंत १ कोटी ६१ लक्ष रुपये वसूल झाले आहेत तर ६ कोटी ७६ लक्ष रुपये थकबाकी असल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले. याबाबत पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन मालमत्ता कर धारकांशी संपर्क साधून ५० टक्के कर भरणा करून घेऊन पुढील महिनाभरात त्या मालमत्ता कर धारकला योग्य तो न्याय देण्याच्या सूचना आ संजय जगताप यांनी यावेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page