नाझरे जलाशयावर भंडारा उधळून जलपूजन

नाझरे जलाशयावर भंडारा उधळून जलपूजन

जेजुरी,दि.१८ ऐतिहासिक जेजुरी शहराच्या उत्तरेला असणाऱ्या आणि पूर्व पुरंदर तालुक्याचे संजीवनी समजले जाणारे नाझरे जलाशय मंगळवारी(दि.१६)सायंकाळी ८ वा पूर्ण क्षमतेने भरले.
७८८दशलक्षघनफुट पाणी साठवण क्षमता असलेले
नाझरे (मल्हारसागर )जलाशय पूर्ण क्षमतेने भरताच शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले .जेजुरी शहरासह ,पारगाव -माळशिरस सह सुमारे ५०गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे ,
तसेच ३१९५ हेकटर ओलिताखाली असल्याने हिवाळी- उन्हाळी पिकांना मोठा लाभ होणार आहे.
परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ राजकीय कार्यकर्ते आदिंनी भंडारा उधळून व साडी -चोळी अर्पण करीत मल्हारसागर जलाशयाचे पूजन केले.
यावेळी जिल्हापरिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे ,जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे,नाझरे कडेपठार सरपंच मनीषा नाझीरकर ,कोळविहिरे सरपंच महेश खैरे ,सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक महेश राणे,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संदीप चिकणे ,नाझरे शाखा प्रकल्प अभियंता अनिल घोडके ,कर्मचारी त्रिभुवन कदम ,दत्ता रोटे ,आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवाह सुरू असून १५० क्यूसेक्सने विसर्ग होत असल्याची माहिती शाखा अभियंता अनिल घोडके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page