नागेश्वर विद्यालयात बालदिन उत्साहात..
जेजुरी, दि. १५ नाझरे क प येथील नागेश्वर विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.१४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि वस्ताद लहुजी साळवी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू आणि वस्ताद लहुजी साळवी यांच्या स्मृती जगण्यात आल्या. जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप चिकणे यांनी देशाचे माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू आणि वस्ताद लहुजी साळवी यांचे चरित्र अत्यंत मार्गदर्शक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, जीवनात समाजसेवेचे त्यांनी अंगीकारलेले जनसेवेचे व्रत तेवढेच आजच्या युगाला प्रेरक आहे. असे म्हटले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, व गुलाबपुष्प देऊन बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.देठे, शिक्षक डी के भावसार, एस डी निकुम, क्षीरसागर, कर्मचारी, तसेच माऊली नाझीरकर, मधुकर गावडे ,ग्रामस्थ उपस्थित होते.