नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट…
मुंबई , दि.२४ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबईतील कोर्टाने हे वॉरंट काढले असून शाळा सोडल्यच्या खोट्या दाखल्यावरून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याचबरोबर नवनीत यांच्यासोबत त्यांच्या वडिलांच्या विरोधातही हे वॉरंट काढण्यात आले आहे.
अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी एका बोगस शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केला होता. यासंदर्भात त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामध्ये मुंबईतील कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने हे वॉरंट काढले आहे. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.