धालेवाडीत जेजुरी पोलिसांकडून गावठी हातभट्टी उध्वस्त, साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त…
जेजुरी, दि. ८ ( प्रतिनिधी) जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे धालेवाडी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी जेजुरी पोलिसांच्या साहाय्याने अवैद्य धंद्यावर मोठी कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना गोपनीय बातमीदाराकडून मौजे धालेवाडी हद्दीतील बेंद वस्ती नजीक नाझरे जलाशयाच्या कडेला असणाऱ्या एका विहिरीजवळ हातभट्टी गावठी दारू भट्टी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खात्री करून आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.एम. गावडे, उपनिरीक्षक एस.एल.पुजारी, सहाय्यक फौजदार बाबर, आदीसह या ठिकाणी धाड टाकली. तुला ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू काढण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी धाड टाकल्याने तेथे असलेला इसम संतोष राठोड हा पळून गेला.
पोलिसांनी या अवैद्य दंध्यावर कारवाई करीत दारू बनवण्यासाठी लागणारे सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३ मोठ्या पातेल्यात असणारे २१हजार लिटर कच्चे रसायन, सुमारे १४ हजार रुपये किमतीचे ६० लिटर गावठी दारू बनवलेले सात निळे प्लास्टिक कॅन, दहा हजार रुपये किमतीची ३ हॉर्स पॉवर ची इलेकट्रीक मोटार, आदी दारू पाडण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जप्त केल्या आहेत. संपूर्ण हातभट्टी उध्वस्त करण्यात आली
अवैद्य धंदा करणारा आरोपी संतोष राठोड, ( संपूर्ण नाव माहीत नाही ) रा.धालेवाडी, ता.पुरंदर जि. पुणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( फ) व भा.द.वि.कलम ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोबत फोटो पाठवला आहे
धालेवाडी येथे गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी कारवाई केली