धनुष्यबाणाचा फैसला लांबणीवर ?
शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाचा फैसला हा लांबणीवर गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय.
शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा फैसला हा लांबणीवर गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज धनुष्यबाणाचा निर्णय होणार नाही, अशी माहिती समोर आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होणार होती पण शिवसेना आज पुरावे सादर करणार असून ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील पोटनिवड
आज पक्षचिन्हाबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात होणार होती पण शिवसेनेला पुरावे सादर करण्याची आज शेवटची तारीख असल्यामुळे शिवसेना आज फक्त पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे ही सुनावणी आज होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकर घेतला जावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे. शिवसेनेचे नेते दुपारी एक वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार आहे. त्यासाठी अनिल देसाई नवी दिल्लीत दाखल झाले. धनुष्यबाण हे चिन्हा शिवसेनेकडेच राहिल, असा विश्वास शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जात आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीवर परिणाम
अंधेरी येथील पोटनिवडणूक तोंडावर आली असून येत्या ३ नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे. तर १७ ऑक्टोबपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकर पक्षचिन्हाचा निकाल लागला तर दोन्ही गटाचे संभ्रम दूर होणार आहेत. तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षचिन्हाचा निकाल लागला नाही तर या निवडणुकीत दोन्ही गटासाठी प्रश्न निर्माण होणार आहेत. सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हा निकाल येण्याआधी पक्षचिन्हाबाबत आणि पक्षाबाबत निर्णय देऊ नये अशी याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या प्रकरणावर सुनावणी होत आहे.
जर या पोटनिवडणुकीच्या आधी पक्षचिन्हाबाबतचा निकाल लागला नाही तर शिंदे गट भाजपकडून आपला उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा आहे. पण पुरावे सादर केल्यानंतर लगेच हा निर्णय होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाने पक्षचिन्ह आम्हाला द्या अशी मागणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.