धक्कादायक .. तरुणीच्या तोंडात मिरची पूड कोंबून शरीर आणि गुप्तांगावर ब्लेडचे वार …पिंपरी चिंचवड मधील गंभीर घटना..
पिंपरी दि.२३ (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून शहरातील महिला सुरक्षीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे
अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील गंगानगर येथे घडली आहे. एका तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिला पकडत तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिच्या गुप्तांगावर दारु ओतून तिच्या अंगावरील कपडे फाडून ब्लेडने वार केले आहेत. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.22) सकाळी 11.30 ते 12.15 च्या सुमारास पांढरकर सभागृहाच्या मागे घडला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
या घटेनेबाबत पीडित तरुणीच्या 32 वर्षीय बहिणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन मारुती घाडगे, (वय-31 रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव, पुणे) याच्यासह इतर तीन अनोळखी विरुद्ध आयपीसी 354, 354 (ड), 324, 506, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करुन आरोपी चेतन घाडगे याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि बहिण म्हणजे पिडीत 27 वर्षीय तरुणी काल गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदीरातून देर्शन घेऊन परत येत होती. त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या कणीस विक्रेत्याकडून पिडित तरुणी कणीस घेत होती. त्यावेळी आरोपी चेतन आणि त्याचे इतर तीन साथिदार त्याठिकाणी आले. तरुणाली पाहून ‘काढ रे कोयता, हिच्यावर वार कर’ असा दम त्यांनी दिला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तेथून पळ काढला. तरुणी रस्त्याने पळत असताना आरोपींनी तिचा पाठलाग केला. त्यामुळे तरुणी गुरुदेवनगर येथील एका सार्वजनिक शौचालयात जाऊन लपली.
आरोपीही तिच्या मागे पळत शौचालयापर्यंत पोहोचले. आरोपींनी तरुणाला पकडून तिच्या अंगावर आणि गुप्तांगावर दारु ओतली.
तसेच तिला मिरची पावडर खायला घालून डोळ्यात मिरची पावडर टाकली.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पिडीत तरुणीच्या हातावर ब्लेडने वार करुन तिेचे सर्व कपडे फाडले.
यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे करीत आहेत.