दिवे येथे भाजीपाला बाजार सुरू, पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची उलाढाल
सासवड दि.२३ (प्रतिनिधी) दिवे( ता.पुरंदर )येथे मागच्या महिन्यात फळबाजार सुरू करण्यात आला याला व्यापारी बांधवांनी उत्सुर्तपणे प्रतिसाद दिल्याने दिवे ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोईसाठी भाजीबाजार सुद्धा सुरू करण्यात आला
दिवे परिसरात तरकारी भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. इथे पिकलेल्या चविष्ट वाटाण्याची राज्यभरातील ग्राहकांना भुरळ पडलेली असते पुणे, मुंबई ,ठाणे ,महाड, कोल्हापूर येथील ग्राहक हे आवर्जून इथला वाटाणा, पावटा, घेवडा, टोमॅटो, पालेभाज्या खरेदी करण्यासाठी येत असतात. दिवे येथे पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या भाजीबाजारात तब्बल दहा लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सरपंच गुलाबतात्या झेंडे यांनी दिली .
पहिल्याच दिवशी शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते. पुरंदर बरोबरच शेजारील बारामती तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव आपला शेतमाल विक्री साठी दिवे येथील बाजारात आले होते.
या बाजाराचे उद्गाटन युवा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या संगिता काळे, सरपंच गुलाबतात्या झेंडे, उपसरपंच श्रद्धा काळे, झेंडेवाडीच्या सरपंच पुनम झेंडे, उपसरपंच कौशल्या झेंडे,
माजी सरपंच अमित झेंडे, बापू सोपान टिळेकर ,रूपेश राऊत शोभा झेंडे ,सुमन टिळेकर ,सुजाता जगदाळे, योगेश काळे, निताताई लडकत , शोभा टिळेकर शोभा लडकत , संतोष झेंडे ,भाऊसाहेब झेंडे, वैभव झेंडे, संतोष झेंडे, रमेश झेंडे उद्योजक भरत झेंडे, ऋषिकेश जाधवराव व दिवेकर ग्रामस्थ ,शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात काही व्यापारी बांधव व शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या बाजारात सध्यातरी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही तसेच भविष्यात क्राँकिटिकरण, छोटे छोटे ओटे, शेड, विजेची व्यवस्था करण्यात येईल एकंदरीत झीरो बजेट असा हा बाजार महाराष्ट्रात आदर्श ठरेल यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन बाबाराजे जाधवराव यांनी केले.
स्थानिकांना मिळणार रोजगार …
दिवे येथे बाजार सुरू झाल्याने हाँटेल व्यवसाय तसेच इतर शेतीपूरक व्यवसाय चालणार असून स्थानिक युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.