दहा ऑक्टोबरला जेजुरी कोळविहिरे रस्ता खुला होणार, रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांना ग्वाही उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित

जेजुरी,दि.४ जेजुरी-कोळविहिरे रस्ता दोन ठिकाणी रेल्वेच्या कामासाठी सहा महिन्यापासून बंद आहे.याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोळविहिरे येथील
सोमनाथ खोमणे व ग्रामस्थांनी सुरु केलेले उपोषण आंदोलन आज स्थगित करण्यात आले.दहा ऑक्टोबरला भोरवाडी पूल व पंधरा ऑक्टोबरला कोळविहीरे भुयारी
मार्ग खुला केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन मागे घेतले.
मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता सचिन पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन ग्वाही दिली. आज सकाळ पासुन आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेच अध्यक्ष डॉ.दिगंबर
दुर्गाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे,जिल्हा बँकेचे संचालक प्रविण शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे,माजी सरपंच बापु भोर,सरपंच महेश
खैरे यांनी रेल्वे प्रशासनाबरोबर पाठपुरावा केला. लेखी आश्वासन मिळत नाही आणि काम सुरु होत नाही तो पर्यंत उपोषण आंदोलन चालु राहील उद्या रविवारी
रेल्वे रोको आंदोलन केले जाईल असे जाहीर केल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. रेल्वे समितीचे सदस्य प्रविण शिंदे यांनी विभागीय रेल्वे अधिकारी यांच्याशी
संपर्क साधून त्यांना काम तातडीने सुरु करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर आज सायंकाळी सहा वाजता सचिन पाटील जेजुरीत आले.त्यांनी उपोषण करणारे सोमनाथ यांनी लेखी पत्र दिले. प्रत्यक्ष कामही सुरु केले.त्यानंतर उपोषण
सोडण्यात आले. सुदामराव इंगळे,डॉ.दुर्गाडे,श्री.झेंडे यांनी पुरंदर तालुक्यातील रेल्वेचे ठिकठिकाण येत असलेल्या अडचणी मांडल्या. बापु भोर,प्रविण शिंदे यांनी रस्ता बंद
असल्याने झालेल्या अडचणी मांडल्या.दहा ऑक्टोबर पर्यंत रस्ता सुरु न झाल्यास पु्न्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बापु भोर यांनी दिला. कोळविहिरेच्या
रस्त्यावर मोठी वाहतुक असल्याने येथे दोन भुयारी मार्ग असावेत असे महेश खैरे यांनी सुचविले. आमदार संजय जगताप व खासदार सुप्रिया सुळे यांच्या
पाठपुराव्यामुळे मार्ग निघाल्याचे प्रविण शिंदे यांनी यावेळी सांगितले.
भोरवाडी येथील पुलाचे काम दहा ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल. कोळविहिरे येथील भुयारी मार्ग दहा ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीसाठी
खुला केला जाईल व उर्वरित भिंत बांधकाम व इतर कामे नोव्हेंबर अखेर पर्यंत पुर्ण केली जातील असे पाटील यांनी जाहीर केले.

छायाचित्र- भोरवाडी(ता.पुरंदर) जेजुरी-कोळविहिरे रस्त्यावरील वाहतुकु दहा ऑक्टोबरला खुली केली जाईल लेखी पत्र मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता सचिन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page