थकबाकी मालमत्ता धारकांकडून जेजुरी पालिका करणार व्याज आकारणी..

जेजुरी, दि. २१ जेजुरी नगर पालिकेकडून शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर व नळ पट्टी भरण्याबाबत आवाहन केले जात आहे मात्र अनेक नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही. दिनांक ३१ मार्च अखेर मालमत्ता कर न भरल्यास दिनांक एक एप्रिल पासून २ टक्के दराने व्याज आकारून कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

 जेजुरी पालिकेच्या वतीने जेजुरी शहरातील मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्तेचे कर व पाणीपट्टी भरण्याबाबत जाहीर पणे अनेक वेळा आवाहन केले आहे, कर थकबाकी दारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई देखील सुरू केली आहे. दिनांक २७  मार्च अखेर थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रामध्ये तसेच शहरातील चौकात फ्लेक्स लावून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 

  तसेच दिनांक १ एप्रिल पासून मालमत्ता थकबाकी दारांकडून प्रती महिना २ टक्के या प्रमाणे २४  टक्के व्याज दर आकारण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी कर भरून जेजुरी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page