ट्रॅक्टर ट्रॉली व पाण्याचे टॅकर चोरणारे आरोपी अटक, एकुण साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त सासवड पोलिसांची दमदार कामगिरी.

सासवड, दि.२२ ( प्रतिनिधी) सासवड पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०७/०९/२०२२ रोजी सायंकाळी ६:०० वा. ते दि. ०८/०९/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. वे सुमारास फिर्यादी दिलीप रामनाथ शेडकर, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे याचा किं. रू १,००,०००/- एक पाण्याचा टँकर भगवे रंगाचा त्यावर पांढरा पट्टा असलेला काळुबाईचे मंदीराचे काम चालू असल्याने पाणी भरून तेथे उभा होता तो कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरूने नेले बाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुरजी नं ३६९/२०२२ भा.दं.वि. का.क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालु होता.

      गुन्हयाचा तपास चालु असतांना पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सय्यद यांनी गुन्हा घडल्यापासुन सासवड ते कोंडवा, सासवड ते कापुरहोळ, सासवड, मरीआईघाट असे वेगवेगळया रोडने सी.सी.टी. व्हि फुटेज पाहुन तपास करत होते. तपासादरम्यान बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढणपुर, राठवडे ता. हवेली गावातील दोन व्यक्ती हे गेले ३/४ महिन्यापासुन वेगवेगळ्या ट्रॅक्टर ट्रॉली व पाण्याचे टँकर आणत आहेत. त्यादिशेने अधिक चौकशी केली असता वरील पथकाने १) गणेश दत्तात्रय मुजुमले, रा. कोंढणपुर, ता. हवेली, जि. पुणे २) अविनाश तानाजी चोरघे, रा. राठवडे, ता. हवेली, जि. पुणे यांना दि.१७/०९/२०२२ रोजी ताब्यात घेवून सासवड पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयातील मालाबाबत चौकशी केली असता सुरूवातीला त्यांनी टाळाटाळ केली परंतु नंतर गुन्हा आम्हीच केल्याचे मान्य केले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी १) दि. ३१/०३/२०२२ ते ०१/०४/२०२२ रोजीच्या रात्री भिवरी, ता. पुरंदर गावचे हददीतुनही एक निळया रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेले बाबत कबुली दिली. २) दि २०/०६/२०२० रोजी ते दि २१/०६/२०२२ रोजी मौजे ताभाड, ता. भोर येथुनही एक विटकरी रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेले बाबत कबुली दिली ३) दि.१५/०७/२०२२ रोजी ते दि. १६/०७/२०२२ रोजो मौजे अस्करवडी, ता. वेल्हे येथुनही एक लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेले बाबत कबुली दिली. ४) दि. २०/०७/२०२२ रोजी ते दि. २१/०७/२०२२ रोजी मौजे सुरवड, ता. वेल्हे येथुनही एक भगवे रंगाचा पाण्याचा टँकर चोरून नेले बाबत कबुली दिली. व ट्रॅक्टर ट्रॉली व पाण्याचे टँकर कलर बदलुन विक्री करण्यासाठी तन्वी ट्रॅक्टर्स व फॅब्रिकेश वर्क नावाने बिलबुक बनवलेचे सांगितले असुन बिलबुक जप्त करण्यात आले आहे. ट्रॅक्टर ट्रॉली व पाण्याचे टँकर बाबत सासवड पो.स्टे. येथे २, राजगड पो.स्टे. येथे १ वेल्हे पो.स्टे. येथे २ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी १) गणेश दत्तात्रय मुजुमले, (वय ३२ वर्षे), रा. कोंढणपुर, ता. हवेली, जि. पुणे
२) अविनाश तानाजी चोरघे, (वय ३३ वर्षे), रा.राठवडे, ता. हवेली, जि. पुणे
यांचेकडुन ट्रॅक्टर ट्रॉली व पाण्याचे टॅटँकर चोरून घेवुन जाण्यासाठी वापरलेला एक न्यु हॉलंड कंपनीचा फोर बाय फोर ट्रॅकटर नं. MH.12.SU.9348 किं. रू. ४,००,०००/- चा गुन्हयात जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपींनी खालील गुन्हे केलेले असुन उघडकिस आणले आहे.

१) सासवड पोलीस स्टेशन येथे गु.रजी . नं . ३६९/२०२२ भा.दं.वि.का.क. ३७९ (पाण्याचा टॅकर किं. रू. १,००,०००/-)
२) सासवड पोलीस स्टेशन येथे गु.रजी. नं. ३८१/२०२२ भा.दं.वि.का.क. ३७९ ( ट्रॅक्टर ट्रॉली किं.रू. ८४,०००/- )
३ ) राजगड पोलीस स्टेशन येथे गु.रजी. नं. २२७/२०२२ भा.दं.वि.का.क. ३७९ ( ट्रॅक्टर ट्रॉली किं.रू. ५०,०००/-)
४) वेल्हे पोलीस स्टेशन येथे गुरजी. नं. ४६/२०२२ भा.दं.वि.का.क. ३७९ ( ट्रॅक्टर ट्रॉली किं. रू. १,००,०००/-)
५) वेल्हे पोलीस स्टेशन येथे गु.रजी. नं. ४७/२०२२ भा.दं.वि.का.क. ३७९ ( पाण्याचा टँकर किं.रू. १,००,०००/-) एकुण किं.रू. ८,३४,०००/- चा मुददेमाल गुन्हयात जप्त आहे.

 सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आण्णासाहेब घोलप, पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सध्यद, निलेश जाधव, सुहास लाटणे, विक्रम भोर, पोलीस मित्र शुभम घोडके यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page