ज्या देशाची शिक्षण प्रणाली उत्कृष्ट आणि मजबूत तोच देश आर्थिक दृष्ट्या श्रीमंत.
सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासामधील तत्परता, एकाग्रता आणि शिक्षकांप्रती निष्ठा टिकून ठेवणे गरजेचे आहे, तरच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकसित होईल, असे प्रतिपादन पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मा श्री भास्कर इदगे यांनी व्यक्त केले,
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयामध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यार्थ्यांमध्ये चारित्र संपन्नता ही त्यांच्या शिक्षणाबरोबरच अभिप्रेत आहे. समाजामध्ये सर्व शिक्षक पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहेत, आदर्श शिक्षकांच्या संकल्पनेतून योग्य व्यवस्थापन आणि कौशल्य याचे उपाययोजन करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच साधता येईल असे प्रतिपादन कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक राजेंद्र पायगुडे यांनी केले.
शिक्षण प्रणालीचा दर्जा उंचावण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यात आले यामध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर आधारित शिक्षणात नवनवीन प्रयोग करून आपल्या देशाची शिक्षण प्रणाली उत्कृष्ट आणि मजबूत झाली आहे. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन आव्हाने स्वीकारून शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडवणे अत्यावश्यक आहे असे मत व्यक्त करून, सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. व्यवस्थापन सदस्य डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या.
आपल्या जीवनातील प्रत्येक वेळ योग्य रीतीने योग्य दिशेने वापरून आपल्या जीवनातील गुरुप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे असे पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य अँड डॉ. सचिन कोतवाल यांनी यावेळी सांगितले. शिक्षक म्हणजे नवनवीन ज्ञान संकल्पना जाणून घेऊन अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, अशा शब्दांत महाविद्यालयाचे प्रा अश्विनी बनकर आणि प्रा किरण घुले यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व्यक्त केले.
या कार्यक्रमात सानिका साळवी, जयेश घोरपडे, तेजस शितोळे आणि जयश्री ब्राह्मणे या विद्यार्थ्यांनी मनोगतामधून शिक्षकांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ग घेतले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा तृषा शंग्रपवार, प्रा सीमा केंजळे, प्रा भाग्यश्री शेलार यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सीमा केंजळे व आभार प्रशांत खाडे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली