जेजुरी स्वामी समर्थ मंदिराचे काम पन्नास टक्के पूर्ण…
जेजुरी, दि.२५ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीखंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी श्री स्वामी सेवामय ट्रस्टच्या वतीने लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिराचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री स्वामीमय सेवा ट्रस्ट गेली अनेक वर्षे जेजुरी ते अक्कलकोट पायीं पालखी सोहळ्याचे आयोजन करत आहे. याबरोबरच तरुणांमध्ये व्यसनमुक्ती साठी विविध उपक्रम,स्वामी प्रकटदीन, गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,दीपोत्सव आदी धार्मिक उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबविले जात आहेत. जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलवाकाठी ट्रस्टने जागा घेवून २०१५ साली लोकसहभागातून स्वामी समर्थांचे मंदिर उभारण्याचे काम हाती घेतले.
सुमारे ७५ लक्ष रुपये खर्चाचे २८०० स्केअर फूट बांधकाम करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ५० टक्के मंदिराचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री स्वामी सेवामय ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे,उपाध्यक्ष माऊली खोमणे, कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी केले आहे