जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात जुगार अड्ड्यावर जेजुरी पोलिसांचा छापा…
एक लाख अडतीस हजार रुपयांची रक्कम जप्त. सात जणांवर गुन्हे दाखल
जेजुरी, दि.१७ जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या तीन पत्ते जुगार अड्ड्यावर जेजुरी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात जुगार खेळणाऱ्या इसमंकडील १ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात प्रियानंद युवराज जगताप ( वय ३१ वर्षे) रा.ससानेनगर, हडपसर, पुणे मुकेशसिंग बाबुलालसिंग कुमार ( वय ४० वर्षे ) रा.साडेसतरानळी, हडपसर पुणे. इम्रान हुसेन पानसरे ( वय २८ वर्षे ) रा.रेल्वे स्टेशन, जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे. गणेश शिवखंड माने ( वय ३२ वर्षे ) रा.भेकराईनगर, हडपसर पुणे. अविनाश किसन थिगे ( वय ४४ वर्षे ) रा.भेकराईनगर हडपसर पुणे. जुबेर हुसेन पानसरे ( वय २६ वर्षे ), जेजुरी रेल्वे स्टेशन, ता.पुरंदर जि.पुणे.7) रविंद्र बबन शेवाळे ( वय ५० वर्षे ) रा. हडपसर, भेकराईनगर पुणे यांच्यावर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या जुगार प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल, दि.१६ रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास जेजुरी गावचे हददीत रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे स्टेशन कडे जाणारे रोडचे कडेला पत्राचे शेडमध्ये काही व्यक्ती तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे ,पोलिस निरीक्षण बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलिस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे, महीला पोलिस उपनिरीक्षक रुपाली पवार पोलिस नाईक गणेश नांदे, प्रविण शेंडे, गणेश गव्हाणे, योगेश चितारे, विनायक हाके यांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे.